वर्ल्डकप विजय मिरवणुकीनंतर मरिन ड्राईव्हवर स्वच्छता मोहीम
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरी विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत आणि जल्लोष करण्यासाठी मुंबईकर (mumbai) हजारोंच्या संख्येने जमले होते. पण कुठेही मोठा जनसमुदाय जमला की कचरा आणि अस्वच्छता होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर मरीन ड्राईव्ह (marine drive) परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी काही किलोमीटरचा संपूर्ण भाग स्वच्छ होता. कारण प्रशासनाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून काही तासांत जागेची स्वच्छता केली.त्यांच्या या अथक प्रयत्नांकडे दुर्लक्ष झाले नाही आणि लोक सोशल मीडियावर पोस्ट, फोटो आणि व्हिडिओद्वारे कामगारांचे कौतुक करत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी ‘पूर्वी आणि नंतर’ असे परिस्थितीचे चित्रण केले आहे.”मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) स्वच्छता कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार. विश्वचषक विजय परेड साजरी करणारे नागरिक जागे होण्याआधीच, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह परिसराची साफसफाई केली होती. आदल्या रात्री मरीन ड्राइव्ह परिसर हजारो शूज आणि चपलांनी भरलेला होता, आणि हे कामगार पहाटेपर्यंत साफसफाई करण्यात व्यस्त होते. आपण सर्वांनी या कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे,,” एका युझरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या ट्विटर वर व्हिडिओ पोस्ट करत सांगितले.ट्विटरवरील युजर्सनी पोस्टला लाईक करून आपले प्रेम दाखवले आहे. या बातमीला 800 हून अधिक लाइक्स होते. लोक कमेंट करत आहेत आणि पुन्हा पोस्ट करत आहेत.”प्रत्येक सकाळी, परिस्थितीची पर्वा न करता, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद…,” असे एका युझरने कमेंटमध्ये म्हटले आहे.हेही वाचारोहित शर्मा… 17 वर्षां आधीही चॅम्पियन आणि आजही!महाराष्ट्रात झिका व्हायरस: 8 रुग्ण नोंदवल्यानंतर केंद्राकडून नियमावली जारी
Home महत्वाची बातमी वर्ल्डकप विजय मिरवणुकीनंतर मरिन ड्राईव्हवर स्वच्छता मोहीम
वर्ल्डकप विजय मिरवणुकीनंतर मरिन ड्राईव्हवर स्वच्छता मोहीम
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरी विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत आणि जल्लोष करण्यासाठी मुंबईकर (mumbai) हजारोंच्या संख्येने जमले होते. पण कुठेही मोठा जनसमुदाय जमला की कचरा आणि अस्वच्छता होणे ही एक सामान्य गोष्ट आहे,
विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर मरीन ड्राईव्ह (marine drive) परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी काही किलोमीटरचा संपूर्ण भाग स्वच्छ होता. कारण प्रशासनाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून काही तासांत जागेची स्वच्छता केली.
त्यांच्या या अथक प्रयत्नांकडे दुर्लक्ष झाले नाही आणि लोक सोशल मीडियावर पोस्ट, फोटो आणि व्हिडिओद्वारे कामगारांचे कौतुक करत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी ‘पूर्वी आणि नंतर’ असे परिस्थितीचे चित्रण केले आहे.
“मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) स्वच्छता कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार. विश्वचषक विजय परेड साजरी करणारे नागरिक जागे होण्याआधीच, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह परिसराची साफसफाई केली होती. आदल्या रात्री मरीन ड्राइव्ह परिसर हजारो शूज आणि चपलांनी भरलेला होता, आणि हे कामगार पहाटेपर्यंत साफसफाई करण्यात व्यस्त होते. आपण सर्वांनी या कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे,,” एका युझरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या ट्विटर वर व्हिडिओ पोस्ट करत सांगितले.
ट्विटरवरील युजर्सनी पोस्टला लाईक करून आपले प्रेम दाखवले आहे. या बातमीला 800 हून अधिक लाइक्स होते. लोक कमेंट करत आहेत आणि पुन्हा पोस्ट करत आहेत.
“प्रत्येक सकाळी, परिस्थितीची पर्वा न करता, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद…,” असे एका युझरने कमेंटमध्ये म्हटले आहे.हेही वाचा
रोहित शर्मा… 17 वर्षां आधीही चॅम्पियन आणि आजही!
महाराष्ट्रात झिका व्हायरस: 8 रुग्ण नोंदवल्यानंतर केंद्राकडून नियमावली जारी