रामास्वामींनंतर डी-सँटिस यांचीही माघार

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्यानंतर आता फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डी-सँटिस यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. निवडणूक न लढवण्याची घोषणा त्यांनी केली. यासोबतच डी-सँटिस यांनी ट्रम्प यांना निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली. ‘कोरोना आणि मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फॉसी यांसारख्या अनेक मुद्द्यांवर माझ्या […]

रामास्वामींनंतर डी-सँटिस यांचीही माघार

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्यानंतर आता फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डी-सँटिस यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. निवडणूक न लढवण्याची घोषणा त्यांनी केली. यासोबतच डी-सँटिस यांनी ट्रम्प यांना निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली. ‘कोरोना आणि मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फॉसी यांसारख्या अनेक मुद्द्यांवर माझ्या आणि ट्रम्प यांच्यात मतभेद आहेत, परंतु तरीही ते जो बायडेन यांच्यापेक्षा चांगले आहेत. त्यामुळेच मी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी निक्की हेलीचे समर्थन करू शकत नाही, कारण त्यांची विचारधारा जुन्या रिपब्लिकन नेत्यांशी मिळती-जुळती आहे. त्यांच्याकडे देशासाठी काही नवीन देण्याची वृत्ती नाही, असे डी-सँटिस यांनी म्हटले आहे. डी-सँटिस यांनी माघार घेतल्यानंतर आता रिपब्लिकन पक्षात ट्रम्प आणि हेली यांच्यात थेट निवडणूक होत आहे.