‘रॅपिड’च्या तीन लढती गमावल्याने डी. गुकेश सहाव्या स्थानावर
वृत्तसंस्था/ वांगेल्स (जर्मनी)
भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशला येथे शेवटच्या तीन फेया गमवाव्या लागल्याने वेसेनहॉस फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेतील रॅपिड प्ले-ऑफमध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. बाद फेरीतील सामने निश्चित करण्यासाठी खेळविण्यात आलेल्या या रॅपिड बुद्धिबळाच्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोवने वर्चस्व राखले. या तऊण उझबेक बुद्धिबळपटूने संभाव्य सातपैकी 5.5 गुण मिळविले आणि जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरसोबतची त्याची लढत बरोबरीत राहिली.अमेरिकेचा फॅबियानो लेव्हॉन अरोनियन या स्पर्धेत सहा पराभव स्वीकाराव्या लागलेल्या आणि केवळ एक सामना बरोबरीत सोडवता आलेल्या डिंग लिरेनच्या पुढे सातव्या स्थानावर आहे.
गुकेशसाठी हा दिवस फार वाईट गेला. दिवसाची सुऊवात काऊआनाविऊद्ध कठीण लढतीने झाली. कारुआनाने त्याला नमविताना कोणतीही युक्ती सोडली नाही. अब्दुसत्तारोव्हविऊद्ध गुकेशला गुंतागुंतीच्या मधल्या खेळात काही कठीण निर्णय घ्यावे लागले आणि तो चुकीच्या बाजूने गेला. तर कीमरविऊद्धचा सामना फक्त 22 चालींमध्ये संपला.
गुकेश आता ‘क्लासिकल टाइम कंट्रोल’खाली खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत काऊआनाशी लढेल. हे सर्वज्ञात आहे की, ‘क्लासिकल’ बुद्धिबळ हे भारतीयांचे बलस्थान आहे आणि कारुआनाला त्याचे आव्हान भारी ठरण्याची शक्यता आहे. अब्दुसत्तारोव्ह फॉर्मात नसलेल्या डिंग लिरेनविरुद्ध, कार्लसन अलिरेझाविरुद्ध, तर व्हिन्सेंट कीमर अरोनियनविरुद्ध खेळणार आहे.
Home महत्वाची बातमी ‘रॅपिड’च्या तीन लढती गमावल्याने डी. गुकेश सहाव्या स्थानावर
‘रॅपिड’च्या तीन लढती गमावल्याने डी. गुकेश सहाव्या स्थानावर
वृत्तसंस्था/ वांगेल्स (जर्मनी) भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशला येथे शेवटच्या तीन फेया गमवाव्या लागल्याने वेसेनहॉस फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेतील रॅपिड प्ले-ऑफमध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. बाद फेरीतील सामने निश्चित करण्यासाठी खेळविण्यात आलेल्या या रॅपिड बुद्धिबळाच्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोवने वर्चस्व राखले. या तऊण उझबेक बुद्धिबळपटूने संभाव्य सातपैकी 5.5 गुण मिळविले आणि जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरसोबतची त्याची […]
