ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करून भारतात पोहोचला पती

कचरापेटीत सापडला मृतदेह वृत्तसंस्था/ हैदराबाद हैदराबादच्या एका 36 वर्षीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या करण्यात आली आहे. हत्येचा आरोप महिलेच्या पतीवरच झाला आहे. हत्या केल्यावर आरोपी पती मुलासोबत हैदराबादमध्ये पोहोचला होता. तसेच त्याने पत्नीच्या आईवडिलांकडे मुलाला सोपविले होते. चैतन्या मधानगीचा मृतदेह ऑस्ट्रेलियात शनिवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कचरापेटीत मिळाला होता. महिला स्वत:चा पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहत […]

ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करून भारतात पोहोचला पती

कचरापेटीत सापडला मृतदेह
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादच्या एका 36 वर्षीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या करण्यात आली आहे. हत्येचा आरोप महिलेच्या पतीवरच झाला आहे. हत्या केल्यावर आरोपी पती मुलासोबत हैदराबादमध्ये पोहोचला होता. तसेच त्याने पत्नीच्या आईवडिलांकडे मुलाला सोपविले होते.
चैतन्या मधानगीचा मृतदेह ऑस्ट्रेलियात शनिवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कचरापेटीत मिळाला होता. महिला स्वत:चा पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहत होती. या प्रकरणाची माहिती मिळताच हैदराबादमधील उप्पलचे आमदार बंडारी लक्ष्मी रेड्डी यांनी चैतन्याच्या आईवडिलांची भेट घेतली आहे.
चैतन्याचा मृतदेह हैदराबाद येथे आणण्यासाठी विदेश मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या कार्यालयालाही कळविण्यात आले आहे. तसेच चैतन्याच्या पतीने तिच्या हत्येची बाब कबूल केली असल्याचे आमदाराने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियातील विनचेल्सियानजीक कचरापेटीत मृतदेह आढळून आला हात. याप्रकरणी होमिसाइड स्क्वाडचे अधिकारी तपास करत आहेत अशी व्हिक्टोरिया पोलिसांकडून सांगण्यात आले