अटल सेतूनंतर आता समृद्धी कॉरिडॉर मार्गाला तडे
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग (Nagpur-Mumbai Samrudhi Mahamarga) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण अवघं एक वर्ष झालं नाही तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं समोर आलं आहे. शहापूर तालुक्यातून जाणा-या समृद्धी महामार्गाच्या वरुन जाणा-या पुलाला भलंमोठं भगदाड पडलंय.विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील (Thane) ही घटना आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गालगतच्या गावांसाठी अंडरपास तसंच ओव्हरब्रिज बांधण्यात आलेत. यातील शेरे-बावघर-शेंद्रूण या गावांना जोडणा-या पुलाला भलंमोठं भगदाड पडलंय. शहापूर तालुक्यातून जाणा-या समृद्धी महामार्ग अद्याप वाहतुकीसाठी सुरू झालेला नाहीये. मात्र त्याआधीच महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोपराज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. 55 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.हेही वाचाअनंत-राधिकाच्या लग्नसमारंभामुळे 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईच्या ‘या’ रस्त्यांवर नो एंट्री
मुंबईतील कामाठीपुराचा होणार पुर्नविकास
Home महत्वाची बातमी अटल सेतूनंतर आता समृद्धी कॉरिडॉर मार्गाला तडे
अटल सेतूनंतर आता समृद्धी कॉरिडॉर मार्गाला तडे
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग (Nagpur-Mumbai Samrudhi Mahamarga) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण अवघं एक वर्ष झालं नाही तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं समोर आलं आहे. शहापूर तालुक्यातून जाणा-या समृद्धी महामार्गाच्या वरुन जाणा-या पुलाला भलंमोठं भगदाड पडलंय.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील (Thane) ही घटना आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या महामार्गालगतच्या गावांसाठी अंडरपास तसंच ओव्हरब्रिज बांधण्यात आलेत. यातील शेरे-बावघर-शेंद्रूण या गावांना जोडणा-या पुलाला भलंमोठं भगदाड पडलंय. शहापूर तालुक्यातून जाणा-या समृद्धी महामार्ग अद्याप वाहतुकीसाठी सुरू झालेला नाहीये. मात्र त्याआधीच महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. 55 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.हेही वाचा
अनंत-राधिकाच्या लग्नसमारंभामुळे 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईच्या ‘या’ रस्त्यांवर नो एंट्रीमुंबईतील कामाठीपुराचा होणार पुर्नविकास