अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा
सध्या राज्यात राजकीय वातावरणात निवडणुकीचे (maharashtra vidhan sabha election 2024) वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या प्रचाराला प्रचंड जोर लावत आहे. यात राज ठाकरेंचा (raj thackeray) मनसे पक्षही जोरदार तयारीला लागला आहे. मनसेने मुंबईतील (mumbai) माहिम (mahim) मतदारसंघातून अमित ठाकरेंना (amit thackeray) उमेदवारी दिली आहे. महायुतीचा मनसेला पाठिंबा असतानाही एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाच्या सदा सरवणकर (sada sarvankar) यांनी माहिम मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला. यामुळे माहिमची ही लढत रंगतदार होणार आहे. अशातच शिवडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिला आहे. शिवडीत (sewri) मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर (bala nandgaokar) यांना आपला पाठिंबा असल्याचं मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी जाहीर केलं आहे. आशिष शेलार यांनी मंगळवारी (5 नोव्हेंबर) शिवडीतील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितलं की “तुम्ही मनसेचं इंजिन हे निवडणूक चिन्ह घराघरांत पोहोचवावं. मनसेसाठी, बाळा नांदगावकर यांच्यासाठी कंबर कसून प्रचार करा”. याआधी भारतीय जनता पार्टीने मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांनादेखील पाठिंबा जाहीर केला आहे. अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. अमित ठाकरे आमच्या घरातीलच मुलगा असून आम्ही त्याच्यासाठी प्रचार करू अशी भूमिका आशिष शेलार व विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी घेतली आहे.आशिष शेलार म्हणाले, “पाठिंब्याबद्दल बाळा नांदगावकर किंवा मनसेने आपल्याला बोलण्याची वाट न पाहता आपण स्वतःहून त्यांचा प्रचार करू. मनसेचं स्वतःचं इंजिन (निवडणूक चिन्ह) आहेच. मी स्वइंजिनाबद्दल बोलतोय, म्हणजेच आपलं इंजिन. आपण मतदारांपर्यंत पोहोचायचं, मनसेचं चिन्ह पोहोचवायचं. लोकांमध्ये जाऊन समस्त महाराष्ट्राच्या हितासाठी, प्रगतीसाठी या (शिवडी) मतदारसंघातून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणू. त्यासाठी तुम्हा सर्वांना कंबर कसावी लागेल”. असंही ते पुढे म्हणाले.हेही वाचामेट्रो स्टेशनवरून राजकीय वादाला तोंड फुटलेमुंबईत दिवाळी सणादरम्यान 40 जण भाजले
Home महत्वाची बातमी अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा
अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा
सध्या राज्यात राजकीय वातावरणात निवडणुकीचे (maharashtra vidhan sabha election 2024) वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या प्रचाराला प्रचंड जोर लावत आहे. यात राज ठाकरेंचा (raj thackeray) मनसे पक्षही जोरदार तयारीला लागला आहे. मनसेने मुंबईतील (mumbai) माहिम (mahim) मतदारसंघातून अमित ठाकरेंना (amit thackeray) उमेदवारी दिली आहे.
महायुतीचा मनसेला पाठिंबा असतानाही एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाच्या सदा सरवणकर (sada sarvankar) यांनी माहिम मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला. यामुळे माहिमची ही लढत रंगतदार होणार आहे. अशातच शिवडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिला आहे.
शिवडीत (sewri) मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर (bala nandgaokar) यांना आपला पाठिंबा असल्याचं मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी जाहीर केलं आहे. आशिष शेलार यांनी मंगळवारी (5 नोव्हेंबर) शिवडीतील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितलं की “तुम्ही मनसेचं इंजिन हे निवडणूक चिन्ह घराघरांत पोहोचवावं. मनसेसाठी, बाळा नांदगावकर यांच्यासाठी कंबर कसून प्रचार करा”.
याआधी भारतीय जनता पार्टीने मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांनादेखील पाठिंबा जाहीर केला आहे. अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. अमित ठाकरे आमच्या घरातीलच मुलगा असून आम्ही त्याच्यासाठी प्रचार करू अशी भूमिका आशिष शेलार व विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी घेतली आहे.आशिष शेलार म्हणाले, “पाठिंब्याबद्दल बाळा नांदगावकर किंवा मनसेने आपल्याला बोलण्याची वाट न पाहता आपण स्वतःहून त्यांचा प्रचार करू. मनसेचं स्वतःचं इंजिन (निवडणूक चिन्ह) आहेच. मी स्वइंजिनाबद्दल बोलतोय, म्हणजेच आपलं इंजिन. आपण मतदारांपर्यंत पोहोचायचं, मनसेचं चिन्ह पोहोचवायचं.
लोकांमध्ये जाऊन समस्त महाराष्ट्राच्या हितासाठी, प्रगतीसाठी या (शिवडी) मतदारसंघातून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणू. त्यासाठी तुम्हा सर्वांना कंबर कसावी लागेल”. असंही ते पुढे म्हणाले.हेही वाचा
मेट्रो स्टेशनवरून राजकीय वादाला तोंड फुटले
मुंबईत दिवाळी सणादरम्यान 40 जण भाजले