बिलियर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये अडवाणीचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा अव्वल बिलीयर्ड्सपटू 38 वर्षीय पंकज अडवाणीचा बिलीयर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. चीनमधील शेनाग्रो शहरामध्ये विश्व बिलीयर्ड्सचे म्युझियम असून आता या म्युझियममध्ये पंकज अडवाणीचे तैलचित्र पहावयास मिळेल. गेल्या नोव्हेंबर महिन्यात पंकज अडवाणीने आयबीएसएफची विश्व बिलीयर्ड्स- स्नूकर्स स्पर्धा जिंकली होती. पंकज अडवाणीने आतापर्यंत 26 वेळेला या क्रीडा प्रकारात विश्वविजेतेपद मिळविले […]

बिलियर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये अडवाणीचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल बिलीयर्ड्सपटू 38 वर्षीय पंकज अडवाणीचा बिलीयर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. चीनमधील शेनाग्रो शहरामध्ये विश्व बिलीयर्ड्सचे म्युझियम असून आता या म्युझियममध्ये पंकज अडवाणीचे तैलचित्र पहावयास मिळेल.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात पंकज अडवाणीने आयबीएसएफची विश्व बिलीयर्ड्स- स्नूकर्स स्पर्धा जिंकली होती. पंकज अडवाणीने आतापर्यंत 26 वेळेला या क्रीडा प्रकारात विश्वविजेतेपद मिळविले आहे. अडवाणीने भारताच्या सौरभ कोठारीचा पराभव करुन गेल्या नोंव्हेबरमध्ये विश्वविजेतेपद हस्तगत केले होते. स्नूकर आणि बिलीयर्ड्स क्षेत्रात पंकज अडवाणीची कामगिरी जागतिक दर्जाची झाल्याने त्याचा बिलीयर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये समावेश करुन गौरव करण्यात आला आहे. विश्व बिलीयर्ड्स हॉल ऑफ फेम म्युझियममध्ये आपला समावेश केल्याबद्दल पंकज अडवाणीने विश्व आंतरराष्ट्रीय बिलीयर्ड्स-स्नूकर फेडरेशनचे आभार मानले आहेत