न्यायालयात स्थगिती; मात्र कंत्राटदाराची चलाखी

हलगा-मच्छे बायपास रस्त्यावर ‘वर्क ईन प्रोग्रेस’चे फलक प्रतिनिधी/ बेळगाव हलगा-मच्छे बायपास रस्त्यावर कंत्राटदाराने चलाखी करत या रस्त्यावर वर्क ईन प्रोग्रेस असा फलक विविध ठिकाणी लावला आहे. त्यामुळे एकप्रकारे हा न्यायालयाचा अवमान करण्यात आला असून त्याविरोधात आता पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली […]

न्यायालयात स्थगिती; मात्र कंत्राटदाराची चलाखी

हलगा-मच्छे बायपास रस्त्यावर ‘वर्क ईन प्रोग्रेस’चे फलक
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्यावर कंत्राटदाराने चलाखी करत या रस्त्यावर वर्क ईन प्रोग्रेस असा फलक विविध ठिकाणी लावला आहे. त्यामुळे एकप्रकारे हा न्यायालयाचा अवमान करण्यात आला असून त्याविरोधात आता पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने एक काम बंद केले आहे. मध्यंतरी 43 शेतकऱ्यांमधील 17 शेतकऱ्यांनी न्यायालयातून माघार घेतली. मात्र उर्वरित शेतकऱ्यांचा खटला त्याठिकाणी प्रलंबित आहे. असे असताना कंत्राटदाराने या रस्त्यावर विविध ठिकाणी लोखंडी बार उभे करून ‘वर्क ईन प्रोग्रेस’ असे फलक लावले आहेत. याची माहिती मिळताच शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने ते फलक काढले आहेत.
न्यायालयामध्ये या रस्त्याचा खटला प्रलंबित आहे. असे असताना त्या ठिकाणी अचानकपणे कंत्राटदाराने असे फलक उभे केल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही लोकशाहीमार्गाने लढा देत असताना कंत्राटदाराने हे फलक उभे केल्याची माहिती रमाकांत बाळेकुंद्री यांनी दिली असून त्याविरोधात आम्ही न्यायालयात पुन्हा दाद मागणार असल्याचे सांगितले.