आदित्य दास, अहोना रे टेटे विजेते
वृत्तसंस्था / चेन्नई
येथे नुकत्याच झालेल्या ड्रिम स्पोर्ट्स टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या आदित्य दासने मुलांच्या 15 वर्षांखालील वयोगटातील तर अहोना रे ने 15 वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेतेपद पटकाविले.
मुलांच्या 15 वर्षांखालील वयोगटातील खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताच्या आदित्य दासने आकाशचा 4-2 असा पराभव करत जेतेपद मिळविले. तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यात आदित्यने एस. बॅनर्जीचा 3-1 तर आकाशने व्ही. दवेचा 3-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
महिलांच्या एकेरीतील अंतिम सामन्यात आहोना रेने श्रीजेनी चक्रवर्तीचा 11-8, 11-9, 11-3, 11-6 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. मुलींच्या विभागात आहोनाने उपांत्य सामन्यात तिताश चटर्जीचा तर श्रीजेनी चक्रवर्तीने आर्या रेडकरचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
Home महत्वाची बातमी आदित्य दास, अहोना रे टेटे विजेते
आदित्य दास, अहोना रे टेटे विजेते
वृत्तसंस्था / चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या ड्रिम स्पोर्ट्स टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या आदित्य दासने मुलांच्या 15 वर्षांखालील वयोगटातील तर अहोना रे ने 15 वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेतेपद पटकाविले. मुलांच्या 15 वर्षांखालील वयोगटातील खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताच्या आदित्य दासने आकाशचा 4-2 असा पराभव करत जेतेपद मिळविले. तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यात आदित्यने एस. बॅनर्जीचा 3-1 […]
