आदिती अशोक 21 व्या स्थानावर

वृत्तसंस्था/ सिंगापूर येथे झालेल्या महिलांच्या विश्व गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला गोल्फपटू आदिती अशोकने 21 वे स्थान मिळविले. या स्पर्धेतील अंतिम फेरीत आदितीने 2-अंडर 70 गुण नोंदविले. या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांच्या कालावधित आदितीने पहिल्या 10 खेळाडूंमध्ये आपले स्थान राखले होते. पण त्यानंतर तिला चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या हॅना ग्रीनने अजिंक्यपद […]

आदिती अशोक 21 व्या स्थानावर

वृत्तसंस्था/ सिंगापूर
येथे झालेल्या महिलांच्या विश्व गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला गोल्फपटू आदिती अशोकने 21 वे स्थान मिळविले. या स्पर्धेतील अंतिम फेरीत आदितीने 2-अंडर 70 गुण नोंदविले.
या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांच्या कालावधित आदितीने पहिल्या 10 खेळाडूंमध्ये आपले स्थान राखले होते. पण त्यानंतर तिला चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या हॅना ग्रीनने अजिंक्यपद पटकाविले. फ्रान्सची सिलेनी बुटेरने उपविजेतेपद पटकाविले.