नवी मुंबई : अदानी कन्व्हेन्शन सेंटर उभारणार
अदानी समूहाच्या अदानी रियल्टीने नवी मुंबईत (navi mumbai) 6-8 दशलक्ष चौरस फूट निवासी, व्यावसायिक आणि किरकोळ जागा विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यात 25,000 आसनक्षमता असलेले कन्व्हेन्शन सेंटरही असेल. हा प्रकल्प आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) शेजारी असेल.हे कन्व्हेन्शन सेंटर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या बरोबरीचे असेल. यात पंचतारांकित हॉटेल्स, कॉर्पोरेट मीटिंग रूम आणि रिटेल आउटलेटचा समावेश असेल. हा 3.5 दशलक्ष चौरस फुटांच्या विकास प्रकल्पाचा भाग आहे.अदानी रियलॅटीनेही वांद्रे-वरळी सी-लिंकजवळ 24 एकरचा भूखंड घेतला आहे. येथे, कंपनी कॉम्प्लेक्स तयार करण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पाच्या एकूण 4.5 दशलक्ष चौरस फुटांपैकी 3.5 दशलक्ष चौरस फूट जागा निवासी विकासासाठी वापरली जाईल.याशिवाय, कंपनी ठाण्यातील 18 एकरच्या एसीसी कॅम्पसला रेसिडेन्शीअल हब बनवत आहे. या प्रकल्पात सहा मजली निवासी इमारती असतील.अदानी रियल्टीचा विस्तार केवळ मुंबईपुरता (mumbai) मर्यादित नाही. या कंपनीकडे अहमदाबाद, गुरुग्राम, पुणे आणि ओडिशा सारख्या शहरांमध्ये निवासी, व्यावसायिक आणि किरकोळ प्रकल्पांवर काम करत आहे.12 वर्षांपूर्वी सुरू झाल्यापासून कंपनीने 24 दशलक्ष चौरस फूट प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि अतिरिक्त 61 दशलक्ष चौरस फुटांवर काम करत आहे. हेही वाचानिवडणूक केंद्रावर कार्यकर्त्यांची कसरतमुंबईतील शाळांना 21 नोव्हेंबरला सुट्टी देण्याची मागणी
Home महत्वाची बातमी नवी मुंबई : अदानी कन्व्हेन्शन सेंटर उभारणार
नवी मुंबई : अदानी कन्व्हेन्शन सेंटर उभारणार
अदानी समूहाच्या अदानी रियल्टीने नवी मुंबईत (navi mumbai) 6-8 दशलक्ष चौरस फूट निवासी, व्यावसायिक आणि किरकोळ जागा विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यात 25,000 आसनक्षमता असलेले कन्व्हेन्शन सेंटरही असेल. हा प्रकल्प आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) शेजारी असेल.
हे कन्व्हेन्शन सेंटर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या बरोबरीचे असेल. यात पंचतारांकित हॉटेल्स, कॉर्पोरेट मीटिंग रूम आणि रिटेल आउटलेटचा समावेश असेल. हा 3.5 दशलक्ष चौरस फुटांच्या विकास प्रकल्पाचा भाग आहे.
अदानी रियलॅटीनेही वांद्रे-वरळी सी-लिंकजवळ 24 एकरचा भूखंड घेतला आहे. येथे, कंपनी कॉम्प्लेक्स तयार करण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पाच्या एकूण 4.5 दशलक्ष चौरस फुटांपैकी 3.5 दशलक्ष चौरस फूट जागा निवासी विकासासाठी वापरली जाईल.
याशिवाय, कंपनी ठाण्यातील 18 एकरच्या एसीसी कॅम्पसला रेसिडेन्शीअल हब बनवत आहे. या प्रकल्पात सहा मजली निवासी इमारती असतील.
अदानी रियल्टीचा विस्तार केवळ मुंबईपुरता (mumbai) मर्यादित नाही. या कंपनीकडे अहमदाबाद, गुरुग्राम, पुणे आणि ओडिशा सारख्या शहरांमध्ये निवासी, व्यावसायिक आणि किरकोळ प्रकल्पांवर काम करत आहे.
12 वर्षांपूर्वी सुरू झाल्यापासून कंपनीने 24 दशलक्ष चौरस फूट प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि अतिरिक्त 61 दशलक्ष चौरस फुटांवर काम करत आहे.हेही वाचा
निवडणूक केंद्रावर कार्यकर्त्यांची कसरत
मुंबईतील शाळांना 21 नोव्हेंबरला सुट्टी देण्याची मागणी