आगामी आर्थिक वर्षात अदानी समूह करणार 1.2 लाख कोटींची गुंतवणूक

2024 ते 2025 या कालावधीत 70 टक्के खर्च अक्षय ऊर्जा व ग्रीन हायड्रोजनवर करणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  अदानी समूहाने 1 एप्रिलपासून येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजे 2024-25 या कालावधीत आपल्या समूहाचा व्यवसाय वाढविण्यासाठी जवळपास 1.2 लाख कोटीहून अधिकची गुंतवणूक करण्याची योजना आखली असल्याची माहिती अदानी समूहाने दिली आहे. यामध्ये विमानतळ, ऊर्जा, बंदरे, कमोडिटी, सिमेंट आणि मीडिया […]

आगामी आर्थिक वर्षात अदानी समूह करणार 1.2 लाख कोटींची गुंतवणूक

2024 ते 2025 या कालावधीत 70 टक्के खर्च अक्षय ऊर्जा व ग्रीन हायड्रोजनवर करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 
अदानी समूहाने 1 एप्रिलपासून येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजे 2024-25 या कालावधीत आपल्या समूहाचा व्यवसाय वाढविण्यासाठी जवळपास 1.2 लाख कोटीहून अधिकची गुंतवणूक करण्याची योजना आखली असल्याची माहिती अदानी समूहाने दिली आहे. यामध्ये विमानतळ, ऊर्जा, बंदरे, कमोडिटी, सिमेंट आणि मीडिया व्यवसायातही गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 7 ते 10 वर्षांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कंपनी आपली गुंतवणूक दुप्पट करुन जवळपास 8.29 लाख कोटी रुपये करणार आहे. याच दरम्यान आर्थिक वर्ष 2024-25 साठी अंदाजे भांडवल खर्च हा 2023-24 च्या तुलनेत 40 टक्क्यांनी अधिक राहणार असल्याचेही नमूद केले आहे.
अक्षय ऊर्जा व ग्रीन हायड्रोजनवर अधिकचा भर
या अगोदर समूहाने 7 ते 10 वर्षात 100 अब्ज डॉलर भांडवली खर्चाची घोषणा केली होती. तसेच अहवालात म्हटल्याप्रमाणे यातील बहुतांश गुंतवणूक वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांमध्ये केली जाणार असून यात अक्षय ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, विमानतळे आणि बंदरे आदींवर भर दिला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
खर्चाची अशी होणार विभागणी
अदानी समूह हा 70 टक्के भांडवल अक्षय ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये गुंतवणूक करणार आहे. तर बहुतेक म्हणजे 30 टक्क्यांचा खर्च हा विमानतळ आणि बंदरांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
अदानी समूह गुजरातमधील लखवडा येथे जगातील सर्वात मोठे रिन्यूएबल एनर्जीचे मोठे पार्क बनवत आहे. ज्याचे आकारमान हे 530 स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरले आहे. हे क्षेत्र पॅरिस शहराच्या 5 पट आहे. याचवेळी समूह देशातील सर्वात मोठे विमानतळही ऑपरेट करत आहे.
या विमानतळाचा ताबा अदानीकडे
जयपूर, अहमदाबाद, लखनौ, गुवाहाटी, मुंबई, मंगळूर आणि तिरुअनंतपुरम अशी सात विमानतळे अदानी समूहाकडे आहेत.