अदानी समूह करणार फिलिपिन्समध्ये गुंतवणूक

व्यापार वाढीसाठी प्रयत्न : बंदराचा विकास करणार नवी दिल्ली :  अदानी पोर्ट्स फिलिपिन्समध्ये बंदर विकासासाठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठे व्यावसायिक गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाकडून फिलिपिन्समध्ये येणाऱ्या काळात व्यापारामध्ये वाढीच्या दृष्टीने गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे. सदरच्या देशामध्ये कंपनी बंदर, विमानतळे, ऊर्जा व संरक्षण क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधत […]

अदानी समूह करणार फिलिपिन्समध्ये गुंतवणूक

व्यापार वाढीसाठी प्रयत्न : बंदराचा विकास करणार
नवी दिल्ली : 
अदानी पोर्ट्स फिलिपिन्समध्ये बंदर विकासासाठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठे व्यावसायिक गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाकडून फिलिपिन्समध्ये येणाऱ्या काळात व्यापारामध्ये वाढीच्या दृष्टीने गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे.
सदरच्या देशामध्ये कंपनी बंदर, विमानतळे, ऊर्जा व संरक्षण क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधत आहे. अलीकडेच अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गौतम यांचे पुत्र करण अदानी यांने फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस ज्युनियर यांची भेट घेऊन व्यापार, व्यवसाय विस्ताराबाबत चर्चा केली. कंपनी तेथील बटान हे बंदर विकास करण्याची तयारी करत आहे. भारतात कंपनीच्या ताफ्यात सध्याच्या घडीला पश्चिम विभागात 7 आणि पूर्वेत 8 बंदरे आहेत.