मृणाल हेब्बाळकरांच्या प्रचारासाठी अभिनेत्रींची हजेरी
सौंदत्ती विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. उमेदवारांकडून प्रचाराचा वेग वाढविला आहे. स्टार प्रचारकांसह चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी प्रचारामध्ये एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकरांच्या प्रचारासाठी चित्रपटसृष्टीतील तारकांनी हजेरी लावून मृणाल हेब्बाळकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. सौंदत्ती तालुक्यातील विविध गावांमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी चित्रपट अभिनेत्री मेघा शेट्टी यांनी प्रचार करून मतदारांना आवाहन केले. सौंदत्ती तालुक्यातील सत्तीगेरी गुडूनमॅगेरी, सोपडल आदी गावांमध्ये प्रचार करण्यात आला. यावेळी चित्रपट अभिनेत्री मौना गु•sमनी, भव्य गौड आदींनी भाग घेतला होता. मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने निवडून देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी आमदार विश्वनाथ वैद्य यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी मृणाल हेब्बाळकरांच्या प्रचारासाठी अभिनेत्रींची हजेरी
मृणाल हेब्बाळकरांच्या प्रचारासाठी अभिनेत्रींची हजेरी
सौंदत्ती विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. उमेदवारांकडून प्रचाराचा वेग वाढविला आहे. स्टार प्रचारकांसह चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी प्रचारामध्ये एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकरांच्या प्रचारासाठी चित्रपटसृष्टीतील तारकांनी हजेरी लावून मृणाल हेब्बाळकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. सौंदत्ती तालुक्यातील विविध गावांमध्ये काँग्रेस […]
