मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी अभिनेत्री नेहा शर्मा ईडीसमोर हजर

मॉडेल आणि अभिनेत्री नेहा शर्मा मंगळवारी नवी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुख्यालयात हजर झाली. ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात चौकशीसाठी ईडीने नेहा शर्माला समन्स बजावले आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, नेहा शर्मा …

मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी अभिनेत्री नेहा शर्मा ईडीसमोर हजर

मॉडेल आणि अभिनेत्री नेहा शर्मा मंगळवारी नवी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुख्यालयात हजर झाली. ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात चौकशीसाठी ईडीने नेहा शर्माला समन्स बजावले आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, नेहा शर्मा मंगळवारी ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाली.

ALSO READ: सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , 38 वर्षीय अभिनेत्री नेहा शर्मा हिचा जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार नोंदवला जात आहे. नेहा शर्मा काही विशिष्ट जाहिरातींद्वारे बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित असल्याचे मानले जाते. संघीय तपास संस्थेने यापूर्वी माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची याच प्रकरणात अशाच पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांची 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

ALSO READ: बॉर्डर 2′ मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

नेहा शर्मा यांच्यापूर्वी उर्वशी रौतेला, सोनू सूद, सुरेश रैना, शिखर धवन यांचीही बेटिंगशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता नेहा शर्मा ईडीच्या रडारवर आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय तपास संस्था अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने नेहाला चौकशीसाठी समन्स बजावले होते. तिला 2 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. 

 

Edited By – Priya Dixit 

ALSO READ: जया बच्चन यांना त्यांची नात नव्याने लग्न करु नये असे का वाटत आहे?