अभिनेत्री लीनाने अंतराळवीरासोबत थाटला संसार
स्वत:च्या वैवाहिक नात्याची घोषणा
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली होती. या मोहिमेसाठी ग्रूप गॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर असतील. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेच्या काही काळातच मल्याळी अभिनेत्री लीनाने कॅप्टन प्रशांत यांच्यासोबतच्या विवाहाची घोषणा केली आहे. नायरसोबत माझा जानेवारीतच विवाह झाला आहे, परंतु याची घोषणा करण्यासाठी या खास दिवसाची प्रतीक्षा करत होते असे लीनाने सांगितले आहे.
ग्रूप कॅप्टन प्रशांत नायर यांना पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून सादर करण्यात आले आहे. हे आमचा देश, आमचे राज्य आणि वैयक्तिक स्वरुपात माझ्यासाठी अत्यंत ऐतिहासिक आहे. प्रशांत आणि मी 17 जानेवारी रोजी पारंपरिक सोहळ्यात विवाहबद्ध झालो आहोत असे लीनाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात तिच्या आणि प्रशांतच्या विवाहाचे क्षण दिसून येत आहेत.
लीनाचा हा दुसरा विवाह आहे, यापूर्वी तिने 2004 मध्ये अभिलाष कुमारसोबत विवाह केला होता, परंतु 2013 मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला होता. लीनाने स्वत:च्या कारकीर्दीत ‘कुट्टू’, ‘दे इंगोट्टू नोक्किये’, ‘बिग बी’ आणि ‘स्नेहम’ यासारख्या हिट मल्याळ आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Home महत्वाची बातमी अभिनेत्री लीनाने अंतराळवीरासोबत थाटला संसार
अभिनेत्री लीनाने अंतराळवीरासोबत थाटला संसार
स्वत:च्या वैवाहिक नात्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी मंगळवारी गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली होती. या मोहिमेसाठी ग्रूप गॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर असतील. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेच्या काही काळातच मल्याळी अभिनेत्री लीनाने कॅप्टन प्रशांत यांच्यासोबतच्या विवाहाची घोषणा केली आहे. नायरसोबत माझा जानेवारीतच विवाह झाला आहे, परंतु याची घोषणा करण्यासाठी या खास दिवसाची प्रतीक्षा […]