अभिनेते सचिन खेडेकर यांची बीएससी मॉलला भेट
बेळगाव : रविवारी दुपारी टिळकवाडी-शुक्रवारपेठ येथील बीएससी मॉलमध्ये अभिनेते सचिन खेडेकर खरेदीसाठी आले आणि अत्यंत सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत त्यांनी आपली खरेदी सुरू ठेवली होती. दरम्यान, मॉलचे स्टोअर मॅनेजर अमजद जमादार यांनी त्यांना ओळखले आणि त्यांचे व त्यांच्या पत्नी जालपा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रारंभी सचिन खेडेकर खरेदी करत असल्याचे कोणालाही लक्षात आले नाही. ते पत्नी व मित्र हेमंत आपटे यांच्या समवेत प्रत्येक मजल्यावर जावून वस्त्रप्रावरणे पाहत होते. मात्र, अल्पावधीतच ग्राहकांना सचिन खेडेकर आल्याचे समजताच त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. आपण सेलिब्रेटी आहोत, असा कोणताही भाव सचिन खेडेकर यांच्या चेहऱ्यावर नव्हता. किंबहुना कोणालाच आपली ओळख सांगितली नाही. परंतु आमच्या मॉलमध्ये त्यांनी भेट देऊन मॉलची शोभा वाढविली, अशी प्रतिक्रिया मॉलच्या व्यवस्थापकांनी दिली.
Home महत्वाची बातमी अभिनेते सचिन खेडेकर यांची बीएससी मॉलला भेट
अभिनेते सचिन खेडेकर यांची बीएससी मॉलला भेट
बेळगाव : रविवारी दुपारी टिळकवाडी-शुक्रवारपेठ येथील बीएससी मॉलमध्ये अभिनेते सचिन खेडेकर खरेदीसाठी आले आणि अत्यंत सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत त्यांनी आपली खरेदी सुरू ठेवली होती. दरम्यान, मॉलचे स्टोअर मॅनेजर अमजद जमादार यांनी त्यांना ओळखले आणि त्यांचे व त्यांच्या पत्नी जालपा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रारंभी सचिन खेडेकर खरेदी करत असल्याचे कोणालाही लक्षात आले नाही. ते पत्नी […]