अभिनेता गोविंदा जाणार शिंदे सरकार मध्ये!

अभिनेता गोविंदा पुन्हा राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या मुळे ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु झाल्या

अभिनेता गोविंदा जाणार शिंदे सरकार मध्ये!

अभिनेता गोविंदा पुन्हा राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या मुळे ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना अभिनेता गोविंदांना उतरवणार असल्याची चर्चा आहे. 

या मतदार संघातून उद्धव ठाकरे यांच्या गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकरांचे सुपुत्र अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या समोर अभिनेता गोविंदा यांना उभे करण्याची शक्यता आहे. गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेतली. त्यामुळे त्यांची शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गोविंदा यांनी उत्तर मुंबई मतदार संघातून काँग्रेसच्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या वेळी त्यांनी भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला. आता पुन्हा ते राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु आहे. 

 

 Edited by – Priya Dixit 

 

Go to Source