विधानसभा निवडणूक : दक्षिण मुंबईतून करोडोची रोकड जप्त
विधानसभा निवडणुकीच्या (maharashtra vidhan sabha election 2024) पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत (mumbai) कारवाई केली आहे. या कारवाईत अडीच कोटी रुपयांची रोकड (cash) जप्त केली आहे. याप्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, बहुतांश नोटा या 500 रुपयांच्या आहेत.विधानसभा निवडणुकीच्या (maharashtra election 2024) पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोकड मिळाली आहे. ही रक्कम आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही इतकी रक्कम कोणाची आहे? याची आयकर विभाग चौकशी करत आहे. याप्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांची कसून चौकशी केली जात आहे. बहुतांश नोटा 500 रुपयांच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त (पायधुनी आणि गिरगाव) आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे (एलटी मार्ग पोलिस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने छापा टाकला. भुलेश्वर मार्केट, काळबादेवी इथे पोलीस निरीक्षक अमोल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे आदींच्या पथकाने मोठ्या प्रमाणात अवैध रोकड घेऊन जाणाऱ्या 12 जणांना अटक केली.पोलिसांनी संशयितांना मुंबई देवी पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीसाठी नेले. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत मोठ्या रक्कमेची रोकड आढळून आली. यानंतर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भरारी पथकाला (एफएसटी) तत्काळ सतर्क करण्यात आले. पथकाचे नेतृत्व नोडल अधिकारी सुरेश कांबळे यांनी केले. ते तत्काळ छायाचित्रकारांसह आले आणि त्यांनी संपूर्ण कारवाईचे रेकॉर्डिंग केले. ताब्यात घेतलेल्या लोकांना पुढील चौकशीसाठी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एकूण 2,33,86,900 रोख रुपये आढळून आले. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले असून रक्कमेची रोख तपासणी करून ती जप्त करण्यात आली आहे. फोर्टमधील बॅलार्ड पिअर येथे असलेल्या आयकर विभागाच्या (income tax department) शाखेला याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानंतर निरीक्षक श्रेयस निश्चल आणि सत्यजित सिंह मीना यांच्यासह अधिकारी पोलिस ठाण्यात पोहोचले. अधिक चौकशीसाठी संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या रकमेचा स्रोत व उद्देश काय आहे, याचा अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.हेही वाचाविधानसभा निवडणूक: प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातरिसॉर्टमध्ये पोहताना तरुणाचा मृत्यू
Home महत्वाची बातमी विधानसभा निवडणूक : दक्षिण मुंबईतून करोडोची रोकड जप्त
विधानसभा निवडणूक : दक्षिण मुंबईतून करोडोची रोकड जप्त
विधानसभा निवडणुकीच्या (maharashtra vidhan sabha election 2024) पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत (mumbai) कारवाई केली आहे. या कारवाईत अडीच कोटी रुपयांची रोकड (cash) जप्त केली आहे. याप्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, बहुतांश नोटा या 500 रुपयांच्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या (maharashtra election 2024) पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोकड मिळाली आहे. ही रक्कम आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही इतकी रक्कम कोणाची आहे? याची आयकर विभाग चौकशी करत आहे. याप्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
बहुतांश नोटा 500 रुपयांच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त (पायधुनी आणि गिरगाव) आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे (एलटी मार्ग पोलिस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने छापा टाकला.
भुलेश्वर मार्केट, काळबादेवी इथे पोलीस निरीक्षक अमोल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे आदींच्या पथकाने मोठ्या प्रमाणात अवैध रोकड घेऊन जाणाऱ्या 12 जणांना अटक केली.
पोलिसांनी संशयितांना मुंबई देवी पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीसाठी नेले. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत मोठ्या रक्कमेची रोकड आढळून आली. यानंतर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भरारी पथकाला (एफएसटी) तत्काळ सतर्क करण्यात आले.
पथकाचे नेतृत्व नोडल अधिकारी सुरेश कांबळे यांनी केले. ते तत्काळ छायाचित्रकारांसह आले आणि त्यांनी संपूर्ण कारवाईचे रेकॉर्डिंग केले. ताब्यात घेतलेल्या लोकांना पुढील चौकशीसाठी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एकूण 2,33,86,900 रोख रुपये आढळून आले.
संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले असून रक्कमेची रोख तपासणी करून ती जप्त करण्यात आली आहे. फोर्टमधील बॅलार्ड पिअर येथे असलेल्या आयकर विभागाच्या (income tax department) शाखेला याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानंतर निरीक्षक श्रेयस निश्चल आणि सत्यजित सिंह मीना यांच्यासह अधिकारी पोलिस ठाण्यात पोहोचले.
अधिक चौकशीसाठी संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या रकमेचा स्रोत व उद्देश काय आहे, याचा अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.हेही वाचा
विधानसभा निवडणूक: प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
रिसॉर्टमध्ये पोहताना तरुणाचा मृत्यू