बेडकांची शिकार केल्यास कारवाई

वाळपई वनाधिकाऱ्यांचा इशारा : शिकारींवर करडी नजर ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या तुकड्या तैनात वाळपई : जम्पिंग चिकनच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. गावागावात बेडकांची शिकार करण्यासाठी फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वनाखात्याला सहकार्य करण्याचे आवाहन वाळपई वन अधिकाऱ्यांनी केली आहे. पावसाळ्यात बेडकांची शिकार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. बेडूक हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे. यामुळे जैवविविधतेतील […]

बेडकांची शिकार केल्यास कारवाई

वाळपई वनाधिकाऱ्यांचा इशारा : शिकारींवर करडी नजर ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या तुकड्या तैनात
वाळपई : जम्पिंग चिकनच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. गावागावात बेडकांची शिकार करण्यासाठी फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वनाखात्याला सहकार्य करण्याचे आवाहन वाळपई वन अधिकाऱ्यांनी केली आहे. पावसाळ्यात बेडकांची शिकार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. बेडूक हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे. यामुळे जैवविविधतेतील घटक म्हणून बेडूक जिवंत राहणे गरजेचे आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर बेडकांची डरांव डरांव सुरू होते. मात्र हा डरांव डरांव आवाज ऐकल्यानंतर बेडकांची शिकार करणाऱ्यांचा मोर्चा बेडकांकडे वळतो.
यापूर्वी बेडकांची शिकार मोठ्या प्रामाणात केली जात असे. मात्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात कडक कारवाई सुरू केल्यानंतर या शिकारीला बऱ्याच प्रमाणात आळा बसलेला आहे. सध्या पाऊस सुरू झालेला आहे. यामुळे बेडकांची डरांव डरांव सुरू झालेली आहे. यामुळे बेडकांच्या शोधासाठी शिकारी वेगवेगळ्dया ठिकाणी आढळून येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या शिकारीला आळा न बसल्यास येणाऱ्या काळात बेडकांची संख्या  मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती आहे. त्याचा पर्यावरण व जैवविविधतेला मोठा फटका बसू शकतो. यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या विरोधात कारवाईची कडक मोहीम सुरू केलेली आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपासून वन खात्याच्या अधिकाऱ्यांना 24 तास ड्युटीवर ठेवण्यात आले आहे. यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या तुकड्या वेगवेगळ्dया भागात तैनात करण्यात आलेल्या आहेत. हे वन कर्मचारी बेडकांच्या शिकाऱ्यांवर करडी नजर ठेवणार आहेत, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी  दिली.
नद्या, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात बेडूक
सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी नाले आहेत. पावसाळ्dयात ते चांगल्या प्रकारे प्रभावित होत असतात. यामुळे सदर ठिकाणी मोठ्या संख्येने बेडूक आढळतात. अशा भागात भागांमध्ये बेडकांची मोठ्या प्रमाणात शिकार होऊ शकते.
नागरिकांचे सहकार्य गरजेचे!
बेडूक विशेषत: ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे शिकाऱ्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे असते. यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. वन खात्याच्या यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य केल्यास जैवविविधता वाचविण्यास मदत होईल, असेही वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी  सांगितले.
रस्त्यावर आढळणाऱ्या बेडकांना मारू नका
पाऊस सुरू झाला की बेडूक अनेक ठिकाणी आढळतात. अनेकवेळा सदर बेडूक नदी, नाल्यातून रस्त्यावर येत असतात. यामुळे रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनांच्या चाकाखाली अनेकवेळा बेडूक चिरडले जातात. यामुळे रस्त्यावर बेडूक आढळल्यास त्यांना वाचविण्याचे आवाहन अधिकाऱ्याकडून करण्यात आले आहे. खास करून चारचाकी वाहनांच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे रस्त्यावर वाहन चालविताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.