Solapur : सोलापुरात पावणेचार लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई!
मध्य रेल्वेने राबविली विशेष मोहीम
सोलापूर : मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेने विक्रमी यश मिळवले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत २३.७६ लाख प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १४१.२७ कोटी दंड वसूल करण्यात आला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत ही कामगिरी १४ टक्क्यांनी जास्त आहे. २०२४-२५ मध्ये २२.०९ लाख प्रवासी विनातिकीट पकडले गेले होते. यावर्षी ही संख्या वाढून २३.७६ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तिकीट तपासणी पथकांच्या सततच्या मोहिमेमुळे अनधिकृत प्रवासावर मोठा आळा बसला असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मुंबई उपनगरी नेटवर्कमध्ये सुरू केलेल्या विशेष एसी लोकल तपासणी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दररोज पकडले जाणारे प्रबासी : ३६८, दैनंदिन दंड बसुली : १.१९ लाख, २४ ७ तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप नंबर ७२०८८१९९८७ दिला आहे.
ऑक्टोबरमध्ये दंडवसुलीत तब्बल ९५ टक्के वाढ
फक्त ऑक्टोबर २०२५ महिन्यातच रेल्वेने केलेली कारवाई लक्षणीय ठरली. २४ पकडलेले प्रवासी : ३.७१ लाख (२०२५) मागील वर्ष: ३ लाख टक्के वाढ, बसूल दंड : २४.८१ कोटी (२०२५), मागील वर्ष : १२.७४ कोटी ९५ टक्के वाढ
Home महत्वाची बातमी Solapur : सोलापुरात पावणेचार लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई!
Solapur : सोलापुरात पावणेचार लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई!
मध्य रेल्वेने राबविली विशेष मोहीम सोलापूर : मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेने विक्रमी यश मिळवले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत २३.७६ लाख प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १४१.२७ कोटी दंड वसूल […]
