काळ्या काचा असलेल्या 780 वाहनांवर कारवाई

कारवाई अधूनमधून सुऊच राहाणार : विधानसभेत गाजला होता विषय, वाहतूक खात्याची फेब्रुवारी महिन्यात विशेष मोहीम पणजी : काचांना काळी फिल्म लावलेल्या (टिंटेड ग्लास) चारचाकी वाहनांविरोधात वाहतूक खात्याने फेब्रुवारी महिन्यात विशेष मोहीम उघडून 780 प्रकरणे नोंद केली आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला असून अशी कारवाई अधूनमधून चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तालुकानिहाय साहाय्यक वाहतूक […]

काळ्या काचा असलेल्या 780 वाहनांवर कारवाई

कारवाई अधूनमधून सुऊच राहाणार : विधानसभेत गाजला होता विषय, वाहतूक खात्याची फेब्रुवारी महिन्यात विशेष मोहीम
पणजी : काचांना काळी फिल्म लावलेल्या (टिंटेड ग्लास) चारचाकी वाहनांविरोधात वाहतूक खात्याने फेब्रुवारी महिन्यात विशेष मोहीम उघडून 780 प्रकरणे नोंद केली आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला असून अशी कारवाई अधूनमधून चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तालुकानिहाय साहाय्यक वाहतूक संचालकांना (एडीटी) त्याबाबतचे निर्देश देण्यात आले असून हा विषय अलिकडेच झालेल्या विधानसभा अधिवेशनात गाजला होता. त्यावेळी कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्याची कार्यवाही करण्यात आली आहे. इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना देखील रोखण्यात आले असून त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक खाते सूत्रांनी दिली. हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न घालणे, रंगीबेरंगी नंबर प्लेट इत्यादी प्रकरणातही वाहनचालक – मालकांना अडवण्यात येऊन कारवाई करण्यात आली. काही गुन्हेगारी प्रकरणातही काळ्dया फिल्म असलेल्या वाहनांचा वापर करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. त्याचाही उल्लेख विधानसभा अधिवेशनातून करण्यात आला होता. गोवा राज्याच्या सीमेवरील चेकपोस्टवर पाळत ठेवून अनेक वाहनांवरील काळ्dया काचाच्या फिल्म काढण्यात आल्या. तसेच वाहनमालकांना पुन्हा काचा काळ्dया कऊ नयेत असे बजावण्यात आले आहे. या कारवाईसाठी मोटरवाहन निरीक्षक, साहाय्यक निरीक्षकांचे साहाय्य घेण्यात आले. काळ्dया काचा करण्यावर बंदी घालण्याची मागणी आता पुढे येत आहे.