आयएमइआर कॉलेजच्या खेळाडूंचे यश

बेळगाव : तमिळनाडू येथील वेल्लूर येथे घेण्यात आलेल्या व्हीइाrयू विद्यापीठ अंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मोहम्मद मुजावरने पुरुष गटात तर रीहा मंतेरो ने बुद्धिबळ स्पर्धेत गणेश भोसलेने यश संपादन करून आंतर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. तमिळनाडू येथील वेल्लूर येथे घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयएमइआरच्या बॅडमिंटनपटू मोहमद मुजावर व मुलींच्या गटात रीया मंतेरो यांनी विजेतेपद पटकावले. […]

आयएमइआर कॉलेजच्या खेळाडूंचे यश

बेळगाव : तमिळनाडू येथील वेल्लूर येथे घेण्यात आलेल्या व्हीइाrयू विद्यापीठ अंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मोहम्मद मुजावरने पुरुष गटात तर रीहा मंतेरो ने बुद्धिबळ स्पर्धेत गणेश भोसलेने यश संपादन करून आंतर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. तमिळनाडू येथील वेल्लूर येथे घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयएमइआरच्या बॅडमिंटनपटू मोहमद मुजावर व मुलींच्या गटात रीया मंतेरो यांनी विजेतेपद पटकावले. बुद्धिबळ स्पर्धेत गणेश भोसलेने संपादन करीत तमिळनाडू येथील ट्रिचरपली येथे होणाऱ्या इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयाचे चेअरमन आर एस मुतालिक डायरेक्टर डॉ. अरिफ शेख क्रीडा निर्देशक जॉर्ज रॉड्रिक्स यांनी गौरव केला आहे.