राज्यातील अपघातसत्र थांबता थांबेना
बांबोळी अपघातात दुचाकीस्वार ठार
पणजी : बांबोळी येथे काल मंगळवारी मारूती अर्टीका कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. आगशी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी दुचाकीस्वाराला गोमेकॉत दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राज्यात गेल्या 16 दिवसात 18 जणांचा वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्या युवकाचे नाव रोहन खेडेकर (वसई, मुंबई) असे आहे. जीए-06-टी-9616 क्रमांकाची मारूती अर्टीका कार सर्व्हिस रोडवरून मडगावहून पणजीच्या दिशेने येत होती. दुसऱ्या रस्त्यावरून फ्लाय ओव्हर खालून दुचाकी क्रमांक एमएच-48-एस-8671 ही दुचाकी पणजीच्या दिशेने येत होती. फ्लायओव्हरवरून रस्ता ओलांडताना कारवर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांची मोठी नुकसानी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार दुचाकी वेगाने आल्याने ताबा संभाळता आला नाही, परिणामी त्याने समोर आलेल्या कारला धडक दिली. आगशी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी राज्यातील अपघातसत्र थांबता थांबेना
राज्यातील अपघातसत्र थांबता थांबेना
बांबोळी अपघातात दुचाकीस्वार ठार पणजी : बांबोळी येथे काल मंगळवारी मारूती अर्टीका कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. आगशी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी दुचाकीस्वाराला गोमेकॉत दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राज्यात गेल्या 16 दिवसात 18 जणांचा वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
