लोकमान्य सोसायटी, इफ्को-टोकियो यांच्याकडून अपघाती विमा प्रदान

बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी आणि इफ्को-टोकियो यांच्यामध्ये 1 लाख अपघाती विमा प्रदान करण्यात आला. इदलहोंड येथील श्री पिसेदेव मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने लोकमान्य सोसायटीच्या विमा सेवेंतर्गत श्री पिसेदेव सोसायटीच्या कर्ज खातेधारकांसाठी समूह विमा कर्जरक्षक केला आहे. दुर्दैवाने पिसेदेव सोसायटीच्या कर्जधारकाचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा अपघाती विमा दावा इफ्को-टोकियो कंपनी व लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने अंमलात […]

लोकमान्य सोसायटी, इफ्को-टोकियो यांच्याकडून अपघाती विमा प्रदान

बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी आणि इफ्को-टोकियो यांच्यामध्ये 1 लाख अपघाती विमा प्रदान करण्यात आला. इदलहोंड येथील श्री पिसेदेव मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने लोकमान्य सोसायटीच्या विमा सेवेंतर्गत श्री पिसेदेव सोसायटीच्या कर्ज खातेधारकांसाठी समूह विमा कर्जरक्षक केला आहे. दुर्दैवाने पिसेदेव सोसायटीच्या कर्जधारकाचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा अपघाती विमा दावा इफ्को-टोकियो कंपनी व लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने अंमलात आणून 1 लाख रकमेचा क्लेम चेक श्री पिसेदेव सोसायटीला सुपूर्द केला. लोकमान्य विमा व्यवस्थापक रोहन कंग्राळकर, इफ्को-टोकियो विमा कंपनी व्यवस्थापक अनंत कोकसेकर व लोकमान्य सोसायटीच्या कोरे गल्ली शाखेचे उपव्यवस्थापक प्रेमानंद पाटील उपस्थित होते.