घोड्याव्हाळ येथे दोन ट्रकांमध्ये अपघात : एक ठार, एक गंभीर
कुंकळ्ळी : मडगाव-काणकोण महामार्गावर घोड्याव्हाळजवळ दोन ट्रकांमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाला मृत्यू आल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. दोन्ही ट्रकांची रात्री सव्वाआठनंतर ही भीषण टक्कर झाली. त्यानंतर यापैकी दहा चाकांच्या अवजड ट्रकातील एकटा जागीच ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकातील व्यक्ती ट्रकात अडकली. सदर व्यक्तीला नंतर बाहेर काढण्यात यश आले असले, तरी तो जबर जखमी झालेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले तसेच वाहनात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी क्रेन आणली गेली. या अपघातामुळे दीड तासाहून जास्त काळ मडगाव-काणकोण मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Home महत्वाची बातमी घोड्याव्हाळ येथे दोन ट्रकांमध्ये अपघात : एक ठार, एक गंभीर
घोड्याव्हाळ येथे दोन ट्रकांमध्ये अपघात : एक ठार, एक गंभीर
कुंकळ्ळी : मडगाव-काणकोण महामार्गावर घोड्याव्हाळजवळ दोन ट्रकांमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाला मृत्यू आल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. दोन्ही ट्रकांची रात्री सव्वाआठनंतर ही भीषण टक्कर झाली. त्यानंतर यापैकी दहा चाकांच्या अवजड ट्रकातील एकटा जागीच ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकातील व्यक्ती ट्रकात अडकली. सदर व्यक्तीला नंतर बाहेर काढण्यात यश आले असले, तरी तो जबर जखमी […]
