अकासा एअर करणार इंजिन खरेदी
सीएफएम इंटरनॅशनलसोबत इंजिन खरेदी करार
नवी दिल्ली :
हवाई क्षेत्रातील कंपनी अकासा एअर यांनी इंजिन खरेदी करण्यासाठी सीएफएम इंटरनॅशनल यांच्यासोबत करार केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या कराराअंतर्गत अतिरिक्त इंजिन आणि इतर सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
कराराअंतर्गतचा व्यवहार किती रुपयांचा झाला आहे याबाबत मात्र कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अकासा एअर या कराराअंतर्गत आपल्या 150 बोईंग 737 मॅक्स विमानांसाठी 300 हून अधिक सीएफएम लीप-1 इंजिन खरेदी करणार आहे. विमान सेवा अधिकाधिक जणांना देण्यासाठी कंपनीने विमान खरेदी प्रक्रियेला वेग दिला आहे. याअंतर्गत यापूर्वी अकासा एअरने 18 जानेवारी रोजी 150 बोईंग विमानांच्या खरेदीची ऑर्डर नोंदवली होती.
Home महत्वाची बातमी अकासा एअर करणार इंजिन खरेदी
अकासा एअर करणार इंजिन खरेदी
सीएफएम इंटरनॅशनलसोबत इंजिन खरेदी करार नवी दिल्ली : हवाई क्षेत्रातील कंपनी अकासा एअर यांनी इंजिन खरेदी करण्यासाठी सीएफएम इंटरनॅशनल यांच्यासोबत करार केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या कराराअंतर्गत अतिरिक्त इंजिन आणि इतर सेवांचा समावेश करण्यात आला आहे. कराराअंतर्गतचा व्यवहार किती रुपयांचा झाला आहे याबाबत मात्र कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अकासा एअर या कराराअंतर्गत […]