पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या आणखी वाढण्यात येण्याची शक्यता
मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर सध्या 96 वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या असून त्यात आणखी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमार्फत करण्यात आलेल्या मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी विविध सूचना देत त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना लोकलच्या फेऱ्या आणखी कशा वाढवल्या जातील यावर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई लोकलच्या फेऱ्या वाढणार असून आपला प्रवास आणखी सोयीचा होऊ शकतो. विनीत अभिषेक म्हणाले की, ‘पश्चिम रेल्वेवर जादा एसी गाड्या सुरू करण्याचा आमचा मानस आहे. एका एसी गाडीमुळे 11 ते 12 फेऱ्या सुरू करता येऊ शकतात. जशा गाड्या वाढतील, तशा फेऱ्याही वाढतील. एसी गाड्यांचे दरवाजे बंद असल्याचा फायदा प्रवाशांची सुरक्षा राखण्यात होतो. मेट्रोसह अन्य सेवांच्या तुलनेत एसी लोकलचे भाडे सध्या परवडण्याजोगे आहेत.’मागील 5-7 वर्षात मुंबईतील बहुसंख्य स्थानकांवर एस्कलेटर्स, इलिव्हेटर्स उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. ‘अमृत भारत स्टेशन्स’अंतर्गत रेल्वे स्थानकांना नवा लूक देण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. मालगाड्यांसाठी वेगळे मार्ग तयार करण्याबरोबरच नव्या प्रवासी रेल्वे वाढवून प्रतीक्षा यादी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सिग्नलिंग सिस्टीम सक्षम केली, रेल्वे मार्गाचे आधुनिकीकरण केले, तर रेल्वेच्या प्रवासी कालावधीत बचत होईल. त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या दरदिवशी 30-31 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. ‘मेरा टिकट, मेरा इनाम’ योजना आपण सुरू केली. त्यातून जवळपास 4 कोटींचा महसूल रेल्वेला मिळाला. तसेच, मुंबई विभागात विनातिकीट प्रवाशांकडून सुमारे नव्वद कोटी वसूल केले असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूयॉर्क, बॉस्टनमधील रेल्वेच्या तुलनेत आपण भारतात चांगली सेवा देत आहोत. भारतातील वाढते रेल्वे अपघात लक्षात घेता, प्रत्येक जीव अनमोल आहे व त्याविषयी संवेदना दाखविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.हेही वाचाकोकण रेल्वेचा 30 जूनपासून मेगा ब्लॉक
‘AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत’; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
Home महत्वाची बातमी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या आणखी वाढण्यात येण्याची शक्यता
पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या आणखी वाढण्यात येण्याची शक्यता
मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर सध्या 96 वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या असून त्यात आणखी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमार्फत करण्यात आलेल्या मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी विविध सूचना देत त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना लोकलच्या फेऱ्या आणखी कशा वाढवल्या जातील यावर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई लोकलच्या फेऱ्या वाढणार असून आपला प्रवास आणखी सोयीचा होऊ शकतो.
विनीत अभिषेक म्हणाले की, ‘पश्चिम रेल्वेवर जादा एसी गाड्या सुरू करण्याचा आमचा मानस आहे. एका एसी गाडीमुळे 11 ते 12 फेऱ्या सुरू करता येऊ शकतात. जशा गाड्या वाढतील, तशा फेऱ्याही वाढतील. एसी गाड्यांचे दरवाजे बंद असल्याचा फायदा प्रवाशांची सुरक्षा राखण्यात होतो. मेट्रोसह अन्य सेवांच्या तुलनेत एसी लोकलचे भाडे सध्या परवडण्याजोगे आहेत.’
मागील 5-7 वर्षात मुंबईतील बहुसंख्य स्थानकांवर एस्कलेटर्स, इलिव्हेटर्स उभारण्याची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. ‘अमृत भारत स्टेशन्स’अंतर्गत रेल्वे स्थानकांना नवा लूक देण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. मालगाड्यांसाठी वेगळे मार्ग तयार करण्याबरोबरच नव्या प्रवासी रेल्वे वाढवून प्रतीक्षा यादी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सिग्नलिंग सिस्टीम सक्षम केली, रेल्वे मार्गाचे आधुनिकीकरण केले, तर रेल्वेच्या प्रवासी कालावधीत बचत होईल. त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या दरदिवशी 30-31 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. ‘मेरा टिकट, मेरा इनाम’ योजना आपण सुरू केली. त्यातून जवळपास 4 कोटींचा महसूल रेल्वेला मिळाला. तसेच, मुंबई विभागात विनातिकीट प्रवाशांकडून सुमारे नव्वद कोटी वसूल केले असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूयॉर्क, बॉस्टनमधील रेल्वेच्या तुलनेत आपण भारतात चांगली सेवा देत आहोत. भारतातील वाढते रेल्वे अपघात लक्षात घेता, प्रत्येक जीव अनमोल आहे व त्याविषयी संवेदना दाखविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.हेही वाचा
कोकण रेल्वेचा 30 जूनपासून मेगा ब्लॉक‘AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत’; हायकोर्टाने रेल्वेला झापलं