टोरांटोतील स्क्वॉश स्पर्धेत अभय सिंग विजेता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या अभय सिंगने गुडफेलो क्लासिक स्क्वॉश स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 9000 डॉलर्स बक्षीस रकमेची ही चॅलेंजर स्क्वॉश स्पर्धा टोरांटो येथे झाली. अभय सिंगचे हे आजवरचे आठवे पीएसए जेतेपद आहे.
जेतेपदाच्या लढतीत अभय सिंगने वेल्सच्या इलियट मॉरिस डेव्हरेडचा 11-7, 11-9, 11-9 असा पराभव केला. कारकिर्दीतील त्याची ही अंतिम फेरीत खेळण्याची 12 वी वेळ होती. त्याने 40 मिनिटांत हा सामना संपवला. जागतिक क्रमवारीत अभय सिंग 66 व्या स्थानावर असून या वर्षातील त्याचे हे दुसरे चॅलेंजर अजिंक्यपद आहे. गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या जेएसडब्ल्यू विलिंग्डन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. येत्या मार्चमध्ये तो कॅनडा ओपन स्क्वॉश स्पर्धेत सहभागी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सांघिक सुवर्ण व मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळविले होते.
Home महत्वाची बातमी टोरांटोतील स्क्वॉश स्पर्धेत अभय सिंग विजेता
टोरांटोतील स्क्वॉश स्पर्धेत अभय सिंग विजेता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या अभय सिंगने गुडफेलो क्लासिक स्क्वॉश स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 9000 डॉलर्स बक्षीस रकमेची ही चॅलेंजर स्क्वॉश स्पर्धा टोरांटो येथे झाली. अभय सिंगचे हे आजवरचे आठवे पीएसए जेतेपद आहे. जेतेपदाच्या लढतीत अभय सिंगने वेल्सच्या इलियट मॉरिस डेव्हरेडचा 11-7, 11-9, 11-9 असा पराभव केला. कारकिर्दीतील त्याची ही अंतिम फेरीत खेळण्याची […]