युगांडा संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी अभय शर्मा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अभय शर्माची आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी युगांडाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अभय शर्माने आपल्या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीमध्ये यापूर्वी भारत अ तसेच 19 वर्षाखालील वयोगटाच्या भारतीय युवा संघाला क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून यशस्वी सेवा बजावली होती. 54 वर्षीय अभय शर्मा गेल्या नोव्हेंबरमध्ये दिल्ली रणजी संघाला मार्गदर्शन करत होते. येत्या जून महिन्यात अमेरिका व विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेला युगांडा हा शेवटचा संघ आहे. तसेच आफ्रिका विभागातून नामिबीया संघानेही या स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
लंकेमध्ये पुढील आठवड्यापासून युगांडा संघासाठी 15 दिवसांच्या कालावधीकरीता सराव शिबिर आयोजित केली आहे. या शिबिरावेळी अभय शर्मा आपल्या प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत युगांडाचा सलामीचा सामना गयाना येथे 3 जून रोजी अफगाण बरोबर होणार आहे.
Home महत्वाची बातमी युगांडा संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी अभय शर्मा
युगांडा संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी अभय शर्मा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अभय शर्माची आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी युगांडाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभय शर्माने आपल्या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीमध्ये यापूर्वी भारत अ तसेच 19 वर्षाखालील वयोगटाच्या भारतीय युवा संघाला क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून यशस्वी सेवा बजावली होती. 54 वर्षीय अभय शर्मा गेल्या नोव्हेंबरमध्ये […]