बाणावलीत ‘आप’च्या जोसेफ पिमेंता यांची सरशी

मडगाव : जोसेफ ग्राब्रिएल पिमेंता या इंडी आघाडीतील आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने 5672 मते मिळवत बाणावलीतील जिल्हा पंचायत निवडणूक जिंकून सांज्याव साजरा केला. अपक्ष उमेदवार ग्रेफन्स फर्नांडिस यांना 2623 मते मिळाल्याने तब्बल 3049 मतांची आघाडी घेत पिमेंता यांनी हा विजय खेचून आणला. अन्य दोन अपक्ष उमेदवारांपैकी रॉयला फर्नांडिस यांना 1840, तर फ्रँक फर्नांडिस यांना 276 […]

बाणावलीत ‘आप’च्या जोसेफ पिमेंता यांची सरशी

मडगाव : जोसेफ ग्राब्रिएल पिमेंता या इंडी आघाडीतील आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने 5672 मते मिळवत बाणावलीतील जिल्हा पंचायत निवडणूक जिंकून सांज्याव साजरा केला. अपक्ष उमेदवार ग्रेफन्स फर्नांडिस यांना 2623 मते मिळाल्याने तब्बल 3049 मतांची आघाडी घेत पिमेंता यांनी हा विजय खेचून आणला. अन्य दोन अपक्ष उमेदवारांपैकी रॉयला फर्नांडिस यांना 1840, तर फ्रँक फर्नांडिस यांना 276 मते मिळाली. बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत रविवारी 52.12 टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत चार उमेदवार रिंगणात असल्याने अटीतटीच्या लढतीची चिन्हे दिसून येत होती. न्यायालयाने आम आदमी पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य हॅन्झेल फर्नांडिस यांचा ओबीसी जात दाखला रद्द करून त्यांना अपात्र ठरवल्याने ही निवडणूक घ्यावी लागली होती.
इंडी आघाडी कायम राहणार : पालेकर
मतांची विभागणी होत आल्याने भाजप विजयी होत आला आहे. याला लगाम घालणे शक्य असल्याचे एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडी आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यात तसेच बाणावलीतील जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीच्या निकालातून दाखवून दिले आहे. यापुढील विधानसभा व अन्य निवडणुकांत इंडी आघाडी कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना दिली.
विजय इंडी आघाडीचा : वेंझी व्हिएगस
हा विजय इंडी आघाडीचा आहे, एकट्या आम आदमी पक्षाचा नाही. आम्ही पक्ष पातळीवर जिल्हा पंचायत निवडणूक लढविली जात असल्याने आघाडीचा उमेदवार त्यात उतरविला. बाणावलीतील सुरावली पंचायतीच्या एका प्रभागासाठी निवडणूक होती. मात्र तळागाळातील निवडणूक म्हणून आम्ही त्यापासून लांब राहिलो, असे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.
पंचायत पोटनिवडणूक निकाल
दरम्यान, मिफा डायस, प्रभाग 5 राशोल पंचायत, ज्युलियाता गोम्स, प्रभाग 2 सुरावली, वंधना बुधलकर, प्रभाग 1 असोळणे पंचायत यांनी सासष्टीतील  विविध पंचायतींमधील पोटनिवडणुकीत बाजी मारली.