मुंबईतील 34 म्हाडा वसाहतीत ‘आपला दवाखाना’

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आरोग्य योजनेच्या धर्तीवर आता म्हाडानेही आपल्या म्हाडा (mhada) वसाहतीत ‘आपला दवाखाना’ (aapla dawakhana) योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाच्या 34 वसाहतींमध्ये रहिवाशी, सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ‘आपला दवाखाना’ योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाने ‘मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल’ या खासगी संस्थेच्या ‘वन रूपी क्लिनिक’शी सामंजस्य करार केला आहे. या योजनेला लवकरच सुरुवात होणार असून म्हाडा रहिवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे उपलब्ध करून देण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या म्हाडाकडून सामाजिक जाणिवेतून गृहनिर्मितीसह अनेक उपक्रम राबविले जातात. मुंबई (mumbai) मंडळाकडून कर्करोग रुग्णांना (cancer patient) आणि त्यांच्या नातेवाईकांना निवासाच्या सोयीकरीता परळमध्ये 100 घरे देण्यात आली आहेत. तर करोनामध्येही करोना केंद्र उभारण्यात म्हाडाचा पुढाकार होता. शिवाय, म्हाडाकडून मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रमासह शालेय विद्यार्थ्यांसाठी, नोकरदार महिलांकरीता वसतिगृह उभारली जात आहेत. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने म्हाडा रहिवाशांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आपला दवाखाना ही आरोग्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वांद्रे (bandra) येथील म्हाडा भवनात बुधवारी म्हाडा आणि ‘मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल’च्या ‘वन रूपी क्लिनिक’शी सामंजस्य करार करण्यात आला. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर , ‘वन रुपी क्लिनिक’चे डाॅ. राहुन घुले, डाॅ. अमोल घुले यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या करारानुसार मुंबईतील म्हाडाच्या 34 वसाहतींमध्ये आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. ‘वन रुपी क्लिनिक’ संस्थेला म्हाडा वसाहतीच्या आवारात दवाखाना सुरू करण्यासाठी 400 चौरस फुटांची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या दवाखान्यात नाममात्र 1 रुपये शुल्कात नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तर रक्त तपासणीसह इतर चाचण्या 100 रुपयांत केल्या जाणार आहेत. वसाहतीतील रहिवाशांसह सर्वसामान्यांनाही आपला दवाखानामध्ये वैद्यकय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. कुलाबा कफ परेड, चेंबूर, पंतनगर – घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, महावीर नगर कांदिवली, प्रतीक्षा नगर शीव, अँटॉप हिल – वडाळा, आदर्श नगर – ओशिवरा, सांताक्रूझ अंधेरी, वांद्रे , जुहू, कुर्ला, मानखुर्द , माहीम, कांदिवली आणि बोरिवली येथे आपला दवाखाना सुरू होणार आहे.हेही वाचा डोंबिवलीतील बँकांना मनसेचे पत्र गोखले पूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन दरम्यान नो एन्ट्री
मुंबईतील 34 म्हाडा वसाहतीत ‘आपला दवाखाना’


‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आरोग्य योजनेच्या धर्तीवर आता म्हाडानेही आपल्या म्हाडा (mhada) वसाहतीत ‘आपला दवाखाना’ (aapla dawakhana) योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाच्या 34 वसाहतींमध्ये रहिवाशी, सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ‘आपला दवाखाना’ योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाने ‘मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल’ या खासगी संस्थेच्या ‘वन रूपी क्लिनिक’शी सामंजस्य करार केला आहे. या योजनेला लवकरच सुरुवात होणार असून म्हाडा रहिवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे उपलब्ध करून देण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या म्हाडाकडून सामाजिक जाणिवेतून गृहनिर्मितीसह अनेक उपक्रम राबविले जातात. मुंबई (mumbai) मंडळाकडून कर्करोग रुग्णांना (cancer patient) आणि त्यांच्या नातेवाईकांना निवासाच्या सोयीकरीता परळमध्ये 100 घरे देण्यात आली आहेत. तर करोनामध्येही करोना केंद्र उभारण्यात म्हाडाचा पुढाकार होता. शिवाय, म्हाडाकडून मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रमासह शालेय विद्यार्थ्यांसाठी, नोकरदार महिलांकरीता वसतिगृह उभारली जात आहेत. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने म्हाडा रहिवाशांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आपला दवाखाना ही आरोग्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वांद्रे (bandra) येथील म्हाडा भवनात बुधवारी म्हाडा आणि ‘मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल’च्या ‘वन रूपी क्लिनिक’शी सामंजस्य करार करण्यात आला. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर , ‘वन रुपी क्लिनिक’चे डाॅ. राहुन घुले, डाॅ. अमोल घुले यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या करारानुसार मुंबईतील म्हाडाच्या 34 वसाहतींमध्ये आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे.‘वन रुपी क्लिनिक’ संस्थेला म्हाडा वसाहतीच्या आवारात दवाखाना सुरू करण्यासाठी 400 चौरस फुटांची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या दवाखान्यात नाममात्र 1 रुपये शुल्कात नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तर रक्त तपासणीसह इतर चाचण्या 100 रुपयांत केल्या जाणार आहेत. वसाहतीतील रहिवाशांसह सर्वसामान्यांनाही आपला दवाखानामध्ये वैद्यकय सुविधेचा लाभ घेता येणार आहे.कुलाबा कफ परेड, चेंबूर, पंतनगर – घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, महावीर नगर कांदिवली, प्रतीक्षा नगर शीव, अँटॉप हिल – वडाळा, आदर्श नगर – ओशिवरा, सांताक्रूझ अंधेरी, वांद्रे , जुहू, कुर्ला, मानखुर्द , माहीम, कांदिवली आणि बोरिवली येथे आपला दवाखाना सुरू होणार आहे.हेही वाचाडोंबिवलीतील बँकांना मनसेचे पत्रगोखले पूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन दरम्यान नो एन्ट्री

Go to Source