आधारकार्ड दुरुस्तीला सर्व्हर डाऊनचा अडथळा

लाभार्थ्यांची हेळसांड : बेळगाव वन कार्यालयावर ताण बेळगाव : आधारकार्ड दुरुस्तीच्या कामात सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. लाभार्थ्यांना दुरुस्तीविना माघारी परतावे लागत आहे. गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीनंतर आधारकार्ड दुरुस्तीला वेग आला आहे. मात्र सर्व्हर डाऊनची समस्या कायम असल्याने कामात अडथळे निर्माण होवू लागले आहेत. शासकीय योजना, शाळा, हॉस्पिटल, गॅरंटी योजना आणि इतर […]

आधारकार्ड दुरुस्तीला सर्व्हर डाऊनचा अडथळा

लाभार्थ्यांची हेळसांड : बेळगाव वन कार्यालयावर ताण
बेळगाव : आधारकार्ड दुरुस्तीच्या कामात सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. लाभार्थ्यांना दुरुस्तीविना माघारी परतावे लागत आहे. गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीनंतर आधारकार्ड दुरुस्तीला वेग आला आहे. मात्र सर्व्हर डाऊनची समस्या कायम असल्याने कामात अडथळे निर्माण होवू लागले आहेत. शासकीय योजना, शाळा, हॉस्पिटल, गॅरंटी योजना आणि इतर सर्वच कामांसाठी आधारकार्ड बंधनकारक आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या आधारकार्डामध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर इतर दुरुस्ती असल्याने यामध्ये फेरबदल करणे गरजेचे आहे. बेळगाव वन, कर्नाटक वन, ग्राम वन आणि बापुजी सेवा केंद्रामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या कार्यालयांमध्ये आधारकार्ड दुरुस्तीसाठी आणि अपडेट करण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी होवू लागली आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे डोकेदुखी वाढत आहे. बेळगाव वन कार्यालयासह शहरात आठ ठिकाणी मिनी बेळगाव वन सुरू करण्यात आली आहेत. खासबाग, टिळकवाडी, अलारवाड, उज्ज्वलनगर, बसवण कुडची, बॉक्साईट रोड, पिरनवाडी, वडगाव आदी ठिकाणी कार्यालये उपलब्ध आहेत. मात्र रिसालदार गल्ली येथील बेळगाव वनमध्येच गर्दी होवू लागली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कामाविना माघारी फिरावे लागत आहे. गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीनंतर आधारकार्ड दुरुस्ती वाढली आहे. अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, विद्यानिधी योजनेसाठी आधारकार्ड अनिवार्य आहे. मात्र आधारकार्डमधील चुका दुरुस्त करणेही गरजेचे आहे. तसेच नवीन जन्मलेल्या बाळांचे आधारकार्ड शिवाय पाच वर्षांवरील बालकांचे आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे बेळगाव वन कार्यालयात वर्दळ वाढू लागली आहे. मात्र सातत्याने सर्व्हर डाऊनची समस्या होत असल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत.