aaaaaaa

चर्चमध्ये पाद्रींसह काही लोक जखमी वृत्तसंस्था/ सिडनी ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये चाकूने वार केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. वेकली येथील द गुड शेफर्ड चर्चमधील एक पाद्री आणि इतर काही लोकांवर हल्ला झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. चाकूहल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक वेळेनुसार सोमवारी चर्चमधील प्रार्थनेपूर्वी ही घटना घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी […]

aaaaaaa

चर्चमध्ये पाद्रींसह काही लोक जखमी
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये चाकूने वार केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. वेकली येथील द गुड शेफर्ड चर्चमधील एक पाद्री आणि इतर काही लोकांवर हल्ला झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. चाकूहल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक वेळेनुसार सोमवारी चर्चमधील प्रार्थनेपूर्वी ही घटना घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिसराची नाकाबंदी करून एकाला अटक केली. ही व्यक्ती पोलिसांना तपासात मदत करत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये बिशप मार मेरी इमॅन्युएल हे चर्चच्या स्टेजवर उभे असताना काळ्या रंगाचा झंपर घातलेला एक व्यक्ती त्याच्याकडे धावत येऊन वार करताना दिसत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील वेस्टफिल्ड बोंडी जंक्शन मॉलमध्ये शनिवारी चाकू आणि गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेत पाच महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.