वडगाव येथील युवकाचा वज्रा फॉल्समध्ये बुडून मृत्यू
रामनगर : जोयडा तालुक्यातील असू ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील इळवे धाबे येथील वज्रा धबधब्यात बेळगाव-वडगाव येथील युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे. शनिवारी सकाळी बेळगाव येथून सहा युवक वज्रा फॉल्स येथे पर्यटनासाठी आले होते. यामधील मंथन अनिल कांदेकर (वय 25, रा. चावडी गल्ली, माधवपूर, वडगाव) हा युवक सायंकाळी साडेचारच्या दरम्यान पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याचा शोध घेण्यात आला परंतु तो सापडला नाही. अखेर रविवारी दुपारी बाराच्या दरम्यान गणेशगुडी येथील राफ्टधारकांना मंथनचा मृतदेह सापडला. सदर मृतदेह शवचिकित्सेसाठी जोयडा येथे पाठवून त्यानंतर कुटुंबीयांकडे देण्यात आला. मंथन हा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून हल्लीच पुणे येथे त्यांच्या नातलगाच्या हॉटेलमध्ये कामाला होता. विदेशात जाण्याच्या उद्देशाने मंगळवारी पासपोर्ट काढण्यासाठी त्याने अपॉइंटमेंट घेतली होती. मात्र, त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. 17 रोजी शहापूर स्मशानभूमीत होणार आहे.
Home महत्वाची बातमी वडगाव येथील युवकाचा वज्रा फॉल्समध्ये बुडून मृत्यू
वडगाव येथील युवकाचा वज्रा फॉल्समध्ये बुडून मृत्यू
रामनगर : जोयडा तालुक्यातील असू ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील इळवे धाबे येथील वज्रा धबधब्यात बेळगाव-वडगाव येथील युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे. शनिवारी सकाळी बेळगाव येथून सहा युवक वज्रा फॉल्स येथे पर्यटनासाठी आले होते. यामधील मंथन अनिल कांदेकर (वय 25, रा. चावडी गल्ली, माधवपूर, वडगाव) हा युवक सायंकाळी साडेचारच्या दरम्यान […]
