मुतग्याजवळ अपघातात शिंदोळीचा युवक ठार
भरधाव कारची धडक
बेळगाव : भरधाव कारने मोटरसायकलला ठोकरल्याने जनता प्लॉट, शिंदोळी येथील एका गवंडी कामगाराचा मृत्यू झाला आहे. बेळगाव-सांबरा रोडवरील मुतगाजवळ रविवारी सायंकाळी 7.30 वाजता हा अपघात घडला आहे. संजू रामचंद्र खनगावकर (वय 32) रा. जनता प्लॉट, शिंदोळी असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मोटरसायकलवरून भाजी आणण्यासाठी संजू मुतग्याला आला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सिव्हिलला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. मारिहाळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Home महत्वाची बातमी मुतग्याजवळ अपघातात शिंदोळीचा युवक ठार
मुतग्याजवळ अपघातात शिंदोळीचा युवक ठार
भरधाव कारची धडक बेळगाव : भरधाव कारने मोटरसायकलला ठोकरल्याने जनता प्लॉट, शिंदोळी येथील एका गवंडी कामगाराचा मृत्यू झाला आहे. बेळगाव-सांबरा रोडवरील मुतगाजवळ रविवारी सायंकाळी 7.30 वाजता हा अपघात घडला आहे. संजू रामचंद्र खनगावकर (वय 32) रा. जनता प्लॉट, शिंदोळी असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मोटरसायकलवरून भाजी आणण्यासाठी संजू मुतग्याला आला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. […]