उसाच्या फडात गांजा पिकविणाऱ्या तरुणाला अटक
बेळगाव : उसाच्या फडात गांजा पिकविणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. घोडगेरी, ता. हुक्केरी येथे यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून गांजा जप्त केला आहे. वीरुपाक्षी नागाप्पा जिद्दी (वय 24) रा. घोडगेरी असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. उसाच्या फडात गांजा पिकविल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम. एन. शिरहट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून गांजाचे झाड ताब्यात घेतले. एकच झाड सुमारे 10 किलोचे असल्याचे यमकनमर्डी पोलिसांनी सांगितले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी उसाच्या फडात गांजा पिकविणाऱ्या तरुणाला अटक
उसाच्या फडात गांजा पिकविणाऱ्या तरुणाला अटक
बेळगाव : उसाच्या फडात गांजा पिकविणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. घोडगेरी, ता. हुक्केरी येथे यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून गांजा जप्त केला आहे. वीरुपाक्षी नागाप्पा जिद्दी (वय 24) रा. घोडगेरी असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. उसाच्या फडात गांजा पिकविल्याची माहिती मिळताच पोलीस […]
