रेल्वे अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाने, मेडिकल कॉलेजच्या छतावरून घेतली उडी

उत्तर प्रदेशमधील देवरियामध्ये महर्षी देवरहा बाबा मेडिकल कॉलेज रुग्णालय इमारतीवरून एका तरुणाने उडी घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचा रेल्वेखाली आल्यामुळे अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी शहरामधील या मेडिकल कॉलेज …

रेल्वे अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाने, मेडिकल कॉलेजच्या छतावरून घेतली उडी

उत्तर प्रदेशमधील देवरियामध्ये महर्षी देवरहा बाबा मेडिकल कॉलेज रुग्णालय इमारतीवरून एका तरुणाने उडी घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचा रेल्वेखाली आल्यामुळे अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी शहरामधील या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

 

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी एका तरुणाने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली. यानंतर या रुग्णालयात एकच गोधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या तरुणाचा रेल्वे अपघात झाला व त्याला जखमी अवस्थेमध्ये मंगळवारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पण त्याच्या सोबत त्याचा एकही माणूस न्हवता. तसेच त्याला पाहायला रुग्णालयामध्ये कोणीही आले नाही. चिकित्सकांचा डोळा चुकवून हा तरुण छतावर गेला व त्याने तिथून थेट खाली उडी घेतली. या तरुणाचे नाव सत्येंद्र कुमार गौतम असून तो 32 वर्षाचा आहे. 

Go to Source