दुर्लभ आजाराने पीडित महिला कुणालाही जेवताना पाहू शकत नाही

कुणाला काही खाताना पाहणे नेहमीच आनंददायी असते. परंतु एका महिलेला दुर्लभ आजारामुळे अन्य कुणाला खाताना पाहणे सहनच होत नाही. कुणी काही खाताना तोंडावाटे निघणारा आवाज तिला सहन होत नाही. या आवाजामुळे ती संतप्त होऊन जोरजोरात ओरडू लागते. या आजारामुळे तिला पार्ट्यांमध्ये जाता येत नाही. घरात देखील ती कुणासोबत डिनर टेबलवर बसून जेवू शकत नाही. कुटुंबीय […]

दुर्लभ आजाराने पीडित महिला कुणालाही जेवताना पाहू शकत नाही

कुणाला काही खाताना पाहणे नेहमीच आनंददायी असते. परंतु एका महिलेला दुर्लभ आजारामुळे अन्य कुणाला खाताना पाहणे सहनच होत नाही. कुणी काही खाताना तोंडावाटे निघणारा आवाज तिला सहन होत नाही. या आवाजामुळे ती संतप्त होऊन जोरजोरात ओरडू लागते. या आजारामुळे तिला पार्ट्यांमध्ये जाता येत नाही. घरात देखील ती कुणासोबत डिनर टेबलवर बसून जेवू शकत नाही. कुटुंबीय तिला एका खोलीत बंद करून जेवत असतात. साउथम्पॅटन येथील रहिवासी असलेली 34 वर्षीय लुईस ही मिसोफोनिया नावाच्या दुर्लभ आजाराने ग्रस्त आहे. हा एक मानसिक डिसऑर्डर आहे. यामुळे पीडित लोक काही आवाजांबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. खाताना निघणारा आवाज, ढेकर, शिंकणे, श्वसनावेळी निर्माण होणारा आवाज, पेनचा क्लिक करण्याचा आवाज, घड्याळ्याच्या काट्याचा आवाज अशा लोकांना क्रोधित करत असतो. अशाप्रकारचे आवाज या लोकांना सहन होत नाहीत. अशाप्रकारचे लोक कुठल्याही पार्टीत सामील होऊ शकत नाहीत तसेच घरात कुटुंबीयांसोबत बसून जेवू शकत नाहीत. घोरणाऱ्या लोकांसोबत झोपणे देखील त्यांना शक्य होत नाही.
मी सर्वसाधारणपणे जितक्या लवकर होईल तितके खाऊन घेते, मग माझ्या खोलीत जाते, जेणेकरून इतरांना जेवताना पाहण्याची वेळ येऊ नये. जर कुणाला पाहिले तर मी रागाच्या भरात त्यांच्यावर हल्ला करेन अशी भीती सतावत असते. परंतु काही आवाजांसोबत जगणे मी शिकल्याचे लुईस सांगते.
माझी ऐकण्याची क्षमता नेहमीच अत्यंत संवेदनशील राहिली आहे. काही आवाज मला अन्य लोकांच्या तुलनेत अधिक स्पष्टपणे ऐकू येतात. संतापल्यावर मी एका लहान मुलाप्रमाणे वागू लागते. कुणी मोठा आवाज करून जेवत असल्यास ते आवडत नाही. मी कुठल्याही स्थितीत लोकांसोबत बसून जेवणे टाळत असल्याचे लुईस यांनी म्हटले आहे.
बिहेवियरल थेरपी
लुईस अनेकदा कारमध्ये बसून खाण्याचा पर्याय निवडते, तेथे ती स्वत:च्या पसंतीचे संगीत ऐकते. गाण्यांच्या आवाजात खाताना निघणारा आवाज कमजोर होत असल्याने तिला तो ऐकू येत नाही. खाताना मी बहुतांशकरून ब्ल्यूटूथ हेडबँड किंवा हेडफोनचा वापर करते. दीर्घकाळ हेडफोन वापरल्याने डोकेदुखी होऊ लागते. अशा स्थितीत लुईस कधीकधी त्रासदायक आवाज रोखण्यासाठी कान फनल आणि रबर ईयरप्लगचा वापर करते. तिच्या या आजारावर बिहेवियरल थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात. रात्रीच्या झोपेच्या वेळेत सुधारणा, तणावाचा स्तर कमी करणे, दैनंदिन व्यायाम आणि संतुलित आहारामुळे लाभ होऊ शकतो.

Go to Source