पुणे ते दिल्ली जाणाऱ्या विमानात महिलेने CISF कर्मचारी महिलेचा चावा घेतला
पुणे दिल्ली विमानात दोन प्रवाशांमध्ये वाद झाला हे वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफच्या महिला कर्मचारीला एका महिला प्रवाशाने मारहाण केली आणि तिच्या हाताचा कडकडून चावा घेतला. महिला प्रवाशाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला पती सोबत पुणे ते दिल्ली विमानातून प्रवास करत होती. त्यांच्या सीट वर इतर दोघे पती पत्नी बसले या वरून महिलेने वाद करायला सुरु केले.
या वादाचे रूपांतरण हाणामारीत होऊ लागले दोघी महिला मारहाण करू लागल्या. हे पाहता विमानातील क्रू मेम्बर ने व्यवस्थापकांना ही माहिती दिली. नंतर सीआरपीएफच्या महिला कर्मचारीला विमानात पाठवण्यात आले. महिला कर्मचारी एका सहकार्यांसह विमानात गेल्या. संतापलेल्या महिलेने महिला कर्मचारीशी गैरवर्तन करत मारहाण केली आणि तिच्या हाताला कडकडून चावले. या मुळे त्या जखमी झाल्या.
महिला कर्मचारीने विमानतळ पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली असून महिलेला विमानातून खाली उतरवण्यात आले नंतर विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले.
Edited by – Priya Dixit