यजमना जर्मनीची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ म्युनिच 2024 च्या युरोपीयन फुटबॉल चॅम्पियन्स स्पर्धेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीने विजयाचे खाते उघडताना स्कॉटलंडचा 5-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला. शुक्रवारच्या या सलामीच्या सामन्यात स्कॉटलंडला 10 खेळाडूनीशी मैदानात खेळावे लागले. जर्मनीतर्फे फ्लोरेन विझ, जमाल मुसाला यांनी पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत दर्जेदार आणि वेगवान खेळावर अधिक भर […]

यजमना जर्मनीची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ म्युनिच
2024 च्या युरोपीयन फुटबॉल चॅम्पियन्स स्पर्धेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीने विजयाचे खाते उघडताना स्कॉटलंडचा 5-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला.
शुक्रवारच्या या सलामीच्या सामन्यात स्कॉटलंडला 10 खेळाडूनीशी मैदानात खेळावे लागले. जर्मनीतर्फे फ्लोरेन विझ, जमाल मुसाला यांनी पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत दर्जेदार आणि वेगवान खेळावर अधिक भर देत गोल नोंदविले. युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासामध्ये जर्मनीतर्फे गोल नोंदविणारे विझ आणि मुसाला हे सर्वात तरुण फुटबॉलपटू आहेत. सामन्याच्या पूर्वार्धात बचावफळीतील रियान पोर्टयस याला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. या संधीचा फायदा घेत केई हावर्टने स्पॉट किकवर जर्मनीचा गोल नोंदविला. 68 व्या मिनिटाला बदली खेळाडू निकोलस फुलक्रूगने जर्मनीचा चौथा गोल केला. जर्मनीचा पाचवा गोल इमेरी कॅनने स्टॉपेझ कालावधीत केला. युरोपीयन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान जर्मनीचा हा सर्वात मोठ्या गोल फरकाने विजय नोंदविला गेला आहे. जर्मनीच्या बचावफळी खेळणारा अँटोनियो रुडिगेरने नजरचुकीने आपल्याच संघाच्या गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडल्याने स्कॉटलंडला हा बोनस गोल मिळाला. जर्मनीने यापूर्वी तीन वेळेला युरोपीयन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकली असून आता ते चौथ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्पेनने आतापर्यंत चार वेळेला युरोपीयन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.