Satara News : पाटण तालुक्यातील येराड गावात शेणकीत अडकला रानगवा

                                  येराड गावात मध्यरात्री रानगव्याचा थरार पाटण : पाटण तालुक्यातील येराड गावातील गणेश साळुंखे यांच्या घराशेजारी शेण टाकण्यासाठी तयार केलेल्या शेणकीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक रानगवा अडकून पडला. बुधवारी सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. येराड येथील […]

Satara News : पाटण तालुक्यातील येराड गावात शेणकीत अडकला रानगवा

                                  येराड गावात मध्यरात्री रानगव्याचा थरार
पाटण : पाटण तालुक्यातील येराड गावातील गणेश साळुंखे यांच्या घराशेजारी शेण टाकण्यासाठी तयार केलेल्या शेणकीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक रानगवा अडकून पडला. बुधवारी सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली.
येराड येथील गणेश हरी साळुंखे यांच्या घराशेजारी गुरांचे शेण टाकण्यासाठी तयार केलेल्या खोल शेणकीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रानगवा अडकला. बुधवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी गावकऱ्यांना उकिरड्यात गदा अडकलेला दिसताच एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. काही वेळ गवा घाबरलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र गव्याला अथक प्रयत्न करून सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खोल शेणकीतून बाहेर पडण्यात यश आले. बाहेर पडताच गवा सैरावैरा पळू लागला.दरम्यान, गवा थेट गावाच्या मुख्य वस्तीकडे वळल्याने काही काळ ग्रामस्थांची पळापळ झाली. सुदैवाने काही वेळानंतर गवा शेजारील शेतातून डोंगराच्या दिशेने निघून गेला.
गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात गब्याचा बाबर आहे. त्याने अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने गव्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.