उत्तर प्रदेशमध्ये वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा मृत्यू!

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील माधोतांडा पोलीस स्टेशन परिसरात शेतात पहारा देण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थाचा सोमवारी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्याचा …

उत्तर प्रदेशमध्ये वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा मृत्यू!

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील माधोतांडा पोलीस स्टेशन परिसरात शेतात पहारा देण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थाचा सोमवारी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार पीलीभीत व्याघ्र प्रकल्प विभागीय वन अधिकारी मनीष सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे आणि पथकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच परिसरातील बासखेडा गावात राहणारा केदारी लाल (50) रविवारी रात्री शेतात पहारा देण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह शेतात पडलेला आढळून आला. पोलिसांनी मृताचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला.

Go to Source