एक अतिधोकादायक मार्ग

जपानमध्ये ‘इरोजहाका’ नामक एक घाट आहे. हा जगातील सर्वात धोकादायक घाट समजला जातो. या मार्गाचे विमानातून काढलेले छायचित्रही आपल्या  मनात धडकी भरविल्याशिवाय रहात नाही. कोणत्याही चारचाकी वाहन चालकाच्या कौशल्याचा जास्तीत जास्त कस या मार्गावर लागतो. अनेक साहसी वाहन चालकांसाठी हा मार्ग म्हणजे आव्हान स्वीकारण्याचे एक स्थान बनला आहे. वास्तविक हा मार्ग दुहेरी आहे. आकाशातून तो […]

एक अतिधोकादायक मार्ग

जपानमध्ये ‘इरोजहाका’ नामक एक घाट आहे. हा जगातील सर्वात धोकादायक घाट समजला जातो. या मार्गाचे विमानातून काढलेले छायचित्रही आपल्या  मनात धडकी भरविल्याशिवाय रहात नाही. कोणत्याही चारचाकी वाहन चालकाच्या कौशल्याचा जास्तीत जास्त कस या मार्गावर लागतो. अनेक साहसी वाहन चालकांसाठी हा मार्ग म्हणजे आव्हान स्वीकारण्याचे एक स्थान बनला आहे.
वास्तविक हा मार्ग दुहेरी आहे. आकाशातून तो एकच असल्याचे दिसते. हा मार्ग जपानच्या टोचिनी प्रांताच्या निक्को या खालच्या भागाला, पर्वतावरच्या ओकुनिक्को भागाला जोडणारा आहे. हा मानवनिर्मिती मार्ग असून प्रथम 1958 मध्ये जुना मार्ग निर्माण करण्यात आला. त्यानंतर, 1965 मध्ये नवा मार्ग निर्माण करण्यात आला. या मार्गाचे वैशिष्ट्या असे की जपानी मुळाक्षरांमधील 48 मुळाक्षरांच्या आकाराची वळणे या मार्गावर आहेत. वाहन चालविण्यासाठी ती अत्यंत कठीण अशीच आहेत. येथे वाहन चालवण्यासाठी चालकाचे चित्त अत्याधिक एकाग्र व्हावे लागते. तसेच त्याचा आत्मविश्वास दृढ असावा लागतो. थोडी चूकही करुन चालत नाही. मात्र, अनेक धाडसी चालक हे आव्हान स्वीकारुन त्याला पुरुनही उरले आहेत. हा मार्ग साहसी चालकांसाठी एक संधीही आहे.