असे अनोखे प्राणीसंग्रहालय जिथे मानव पिंजऱ्यात आणि प्राणी बाहेर फिरतात

अनेकदा लोक प्राणीसंग्रहालयात दुर्मिळ प्राणी पाहण्यासाठी जातात. येथे अनोखे आणि धोकादायक प्राणी पिंजऱ्यात ठेवले जातात.

असे अनोखे प्राणीसंग्रहालय जिथे मानव पिंजऱ्यात आणि प्राणी बाहेर फिरतात

अनेकदा लोक प्राणीसंग्रहालयात दुर्मिळ प्राणी पाहण्यासाठी जातात. येथे अनोखे आणि धोकादायक प्राणी पिंजऱ्यात ठेवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या प्राणिसंग्रहालयाबद्दल सांगणार आहोत, जिथे माणूस पिंजऱ्यात बंद असतो आणि प्राणी मोकाट फिरतात. हे ठिकाण आहे चीनचे लेहे लेडू वन्यजीव प्राणी संग्रहालय. या ठिकाणी प्राणी मोकाट फिरतात तर त्यांना बघायला येणारे माणसे चक्क पिंजऱ्यातून त्यांना बघतात.

 

हे अनोखे प्राणीसंग्रहालय चीनच्या चोंगकिंग शहरात आहे. ते 2015 मध्ये उघडण्यात आले. इथे लोकांना प्राण्यांना अगदी वेगळ्या पद्धतीने आणि जवळून पाहण्याची संधी मिळाली आहे. येथे फिरायला येणारे लोकही पिंजऱ्याच्या आतून हाताने जनावरांना चारा देतात. प्राणीसंग्रहालयात पर्यटकांना पिंजऱ्यात पकडून प्राण्यांच्या परिसरात नेले जाते. कधी अन्नाच्या लोभापोटी प्राणीही पिंजऱ्याजवळ येतात तर कधी पिंजऱ्यावर चढतात. सिंहासारखा भयंकर प्राणी इतक्या जवळून पाहणे हा वेगळाच अनुभव असतो.

 

येथील पाहुण्यांना एक थरारक आणि नवीन अनुभव द्यायचा आहे, असे प्राणिसंग्रहालयाचे संरक्षक सांगतात. या प्राणिसंग्रहालयात पर्यटकांच्या सुरक्षेबाबत कडक सूचना दिल्या आहेत. याशिवाय लोकांच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कॅमेऱ्यांद्वारे पिंजरे आणि प्राण्यांवर 24 तास नजर ठेवली जाते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, मदत पाच ते 10 मिनिटांत पोहोचू शकते. या  प्राणीसंग्रहालयात तुम्हाला शेर, बंगाल टायगर, पांढरा वाघ आणि अस्वल सारखे धोकादायक प्राणी जवळून पाहता येतात.