सेवा बजावून परतलेल्या कॅप्टन बापू राऊळ यांचे शिरशिंगेत अनोखे स्वागत

सावंतवाडी | प्रतिनिधी सैन्य दलात सेवा बजावल्यानंतर कॅप्टन म्हणून सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या गावी परतल्यानंतर अशा सैनिकांचा अनोखा गौरव सोहळा आणि त्याची गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्याची आगळीवेगळी पद्धत शिरशिंगे येथे आज पाहायला मिळाली. कॅप्टन श्री बापू शिवराम राऊळ हे मुंबई इंजिनिअरिंग ग्रुप आर्मी कॅप्टन म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. कमी वयात एवढी […]

सेवा बजावून परतलेल्या कॅप्टन बापू राऊळ यांचे शिरशिंगेत अनोखे स्वागत

सावंतवाडी | प्रतिनिधी
सैन्य दलात सेवा बजावल्यानंतर कॅप्टन म्हणून सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या गावी परतल्यानंतर अशा सैनिकांचा अनोखा गौरव सोहळा आणि त्याची गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्याची आगळीवेगळी पद्धत शिरशिंगे येथे आज पाहायला मिळाली. कॅप्टन श्री बापू शिवराम राऊळ हे मुंबई इंजिनिअरिंग ग्रुप आर्मी कॅप्टन म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. कमी वयात एवढी पदवी प्राप्त केल्यानंतर गावात येताच ग्रामपंचायत, फौजदार घराणे तसेच देवस्थान मानकरी ,शाळेतील मुले, ग्रामस्थ यांनी गावच्या सीमेपासून ते संपूर्ण गावात कॅप्टन श्री बापू शिवराम राऊळ यांची स्वागत भव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीत गावचे सर्व ग्रामस्थ, महिला ,युवक, शाळकरी मुले ,सहभागी झाले होते. या अनोख्या स्वागत मिरवणुकेने गावची सैनिक परंपरा अधोरेखित झाली. या गावात सैनिक परंपरा आहे. आतापर्यंत या गावातून अनेक सैन्य दलात उच्चस्तरिय अधिकारी बनले आहेत . मात्र कमी वयात बापू रावळ यांनी हे शिखर पार केल्याबद्दल गावच्या वतीने त्यांचा हा सन्मान करण्यात आला . यावेळी चंद्रकांत राऊळ, गणू राऊळ ,सुरेश राऊळ ,माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ ,संतोष राऊळ ,तुकाराम राऊळ, सरपंच दीपक राऊळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,तसेच माजी सरपंच सुरेश शिर्के ,माजी सरपंच जीवन लाड, रवींद्र मडगावकर, पुरुषोत्तम राऊळ , आदींनी त्यांचा सत्कार केला. गावातील तरुणांना यातून एक प्रेरणा मिळावी यासाठी हे अनोखे स्वागत एका सैनिकाचे करण्यात आले.