‘वर्कस्मेल’ दूर करण्यासाठी अनोखा मार्ग

सर्वच नोकऱ्यांमध्ये काही ना काही प्रमाणात तणाव हा असतो. परंतु कार्यालयात नकारात्मका असेल आणि बॉस देखील सहाय्यभूत नसेल तर माणसांना तणाव हा जाणवणारच. अशा खराब वातावरणामुळे माणसाला नैराश्य येऊ शकते. याचमुळे एका देशात लोक अशाप्रकारचा तणाव कमी करण्यासठी अनोखा मार्ग अवलंबित आहेत. येथे लोक स्वत:चा बॉस आणि सह-कर्मचाऱ्यांची ऑनलाईन विक्री करत आहेत. हा प्रकार चीनमध्ये […]

‘वर्कस्मेल’ दूर करण्यासाठी अनोखा मार्ग

सर्वच नोकऱ्यांमध्ये काही ना काही प्रमाणात तणाव हा असतो. परंतु कार्यालयात नकारात्मका असेल आणि बॉस देखील सहाय्यभूत नसेल तर माणसांना तणाव हा जाणवणारच. अशा खराब वातावरणामुळे माणसाला नैराश्य येऊ शकते. याचमुळे एका देशात लोक अशाप्रकारचा तणाव कमी करण्यासठी अनोखा मार्ग अवलंबित आहेत. येथे लोक स्वत:चा बॉस आणि सह-कर्मचाऱ्यांची ऑनलाईन विक्री करत आहेत. हा प्रकार चीनमध्ये घडत आहे. येथे कर्मचारी स्वत:चा बॉस, सह-कर्मचारी आणि नोकऱ्या देखील सेकंड हँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी नोंदणीकृत करत आहेत.
अलीबाबाचे सेकंड हँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जियानयूवर अनेक लोक कामाचा तणाव कमी करण्यासाठी आणि ‘वर्क स्मेल’ दूर करण्यासाठी स्वत:च्या नोकऱ्या आणि सह-कर्मचाऱ्यांना विकत आहेत. चीनमध्ये दिवसभराच्या कामानंतर जो मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो, त्याला ‘वर्क स्मेल’ म्हटले जाते. वेबसाइटवर करण्यात आलेल्या लिस्टिंगमध्ये अनेक ‘त्रास देणारे बॉस’, ‘बेकार नोकऱ्या’ आणि ‘तणाव देणारे सहकर्मचारी’ सामील आहेत. हे सर्व 4-9 लाख रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
लक्ष देण्याची बाब म्हणजे लोक हा प्रकार थट्टेच्या स्वरुपात करत आहेत. परंतु विक्रते जाहिरातीमुळे प्रत्यक्ष रोख देवाणघेवाण होऊ नये याची खबरदारी घेत आहेत. जर कुणी प्रॉडक्ट खरेदी करत असेल तर विक्रेता सर्वसाधारणपणे देवाणघेवणीनंतर त्वरित व्यवहार रद्द करतो किंवा खरेदीचा प्रयत्न थेट रोखत असतो.
कुणीतरी पूर्वीच पेमेंट केले, परंतु मी त्याला रिफंड ऑफर केला आणि लिस्टिंगला डिलिट केले. हे केवळ माझ्या भावना व्यक्त करण्याची पद्धत होती. प्रत्यक्षात कुणालाच खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा हेतू नव्हता. मी अनेक लोकांना जियानयूवर स्वत:च्या नोकऱ्या विकताना पाहिले आहे. मला हा प्रकार रंजक वाटला आणि याचमुळे त्याचा अनुभव घेऊ इच्छित होतो. स्वत:च्या नोकरीत वीकेंड नसल्याने ती केवळ 9.9 युआनमध्ये विकणे छोटा सूड उगविण्यासारखे होते असे एका अज्ञात विक्रेत्याने म्हटले आहे.