कूपनलिकेत पडला दोन वर्षाचा बालक

इंडी तालुक्यातील घटना : बचावकार्य हाती वार्ताहर /विजापूर विजापूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील लच्चयान गावात बुधवारी सायंकाळी दोन वर्षाचा बालक उघड्या कूपनलिकेत पडला. सात्विक मुजगोंडा (वय 2) असे बालकाचे नाव आहे. या घटनेनंतर तात्काळ जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य हाती घेण्यात आले. सदर बालक कूपनलिकेत 16 फूट खोलीवर अडकल्याचे सांगण्यात येत असून बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. […]

कूपनलिकेत पडला दोन वर्षाचा बालक

इंडी तालुक्यातील घटना : बचावकार्य हाती
वार्ताहर /विजापूर
विजापूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील लच्चयान गावात बुधवारी सायंकाळी दोन वर्षाचा बालक उघड्या कूपनलिकेत पडला. सात्विक मुजगोंडा (वय 2) असे बालकाचे नाव आहे. या घटनेनंतर तात्काळ जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य हाती घेण्यात आले. सदर बालक कूपनलिकेत 16 फूट खोलीवर अडकल्याचे सांगण्यात येत असून बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बालकाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती ग्राम पंचायत सदस्य यशवंत यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच इंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच बचावकार्यासाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने कूपनलिकेच्या बाजूने खोदाई करण्यात येत आहे. बालकासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली आहे.