क्रॉसिंगसाठी वळविलेल्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीची धडक
युवक जखमी ; पाट – परुळे मार्गावर माड्याचीवाडी येथील घटना
वार्ताहर/ कुडाळ
पाट – परुळे मार्गावर माड्याचीवाडी सोसायटी नजीक बस थांबा येथे क्रॉसिंगसाठी वळविलेल्या टिव्हिएस दुचाकीला कुडाळहून भोगवेच्या दिशेने जाणाऱ्या पल्सर दुचाकीची जोरात धडक बसली.दुचाकीस्वार युवक जखमी झाला,तर दुसरी महिला दुचाकीस्वार हिलाही दुखापत झाली. बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , या मार्गावरून कुडाळहून भोगवेच्या दिशेने एक युवक आपल्या ताब्यातील पल्सर घेऊन जात होता. त्याच मार्गावरून त्याच्या दुचाकीच्या पुढे एक महिला आपल्या ताब्यातील टिव्हिएस दुचाकीला घेऊन जात होती.तिच्या दुचाकीच्या मागे तिचा मुलगा बसला होता. माड्याचीवाडी येथील सोसायटी नजीक त्या महीलेने आपल्या ताब्यातील दुचाकी उजव्या बाजूला वळविली.तेव्हा पाठी मागून भोगावेच्या दिशेने जाणाऱ्या त्या युवकाच्या ताब्यातील दुचाकीची त्या महिलेच्या दुचाकीला जोराची धडक बसली.त्यात दुचाकीस्वार युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर त्या महिलेला व तिच्या मुलाला कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दोन्ही दुचाकीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. निवती पोलीस ठाण्याचे पोलीस दीपक गावडे, महिला पोलीस श्रीमती पाडावे घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेची नोंद रात्री उशिरा पर्यंत निवती पोलीस ठाण्यात नव्हती.
Home महत्वाची बातमी क्रॉसिंगसाठी वळविलेल्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीची धडक
क्रॉसिंगसाठी वळविलेल्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीची धडक
युवक जखमी ; पाट – परुळे मार्गावर माड्याचीवाडी येथील घटना वार्ताहर/ कुडाळ पाट – परुळे मार्गावर माड्याचीवाडी सोसायटी नजीक बस थांबा येथे क्रॉसिंगसाठी वळविलेल्या टिव्हिएस दुचाकीला कुडाळहून भोगवेच्या दिशेने जाणाऱ्या पल्सर दुचाकीची जोरात धडक बसली.दुचाकीस्वार युवक जखमी झाला,तर दुसरी महिला दुचाकीस्वार हिलाही दुखापत झाली. बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार […]
