जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात कारवर झाड कोसळले

बेळगाव : जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील झाड कोसळून कारचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. यावेळी तेथे कोणी नसल्याने अनर्थ टळला आहे. यापूर्वी अशाप्रकारे झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा वनविभागाने सर्व्हे करून धोकादायक असलेली झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात जिल्हा कौटुंबिक न्यायालयाची इमारत उभारण्यात […]

जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात कारवर झाड कोसळले

बेळगाव : जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील झाड कोसळून कारचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. यावेळी तेथे कोणी नसल्याने अनर्थ टळला आहे. यापूर्वी अशाप्रकारे झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा वनविभागाने सर्व्हे करून धोकादायक असलेली झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात जिल्हा कौटुंबिक न्यायालयाची इमारत उभारण्यात आली आहे. त्या इमारतीसमोरच अनेक झाडे आहेत. त्या झाडांच्या परिसरात पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. त्याच ठिकाणचे झाड कोसळले. या परिसरात वकील व पक्षकार वाहने पार्किंग करतात. गुरुवारी झालेल्या पावसामुळे  झाड कोसळले आहे. त्यानंतर तातडीने कामगारांना बोलावून झाड हटविण्यात आले. या घटनेत कारचे नुकसान झाले आहे.